Bigg Boss 14 : निक्की तांबोळीचे नखरे घरातल्यांच्या नाकात आणणार दम, पवित्रा पुनियासोबत होणार हातापाई

By तेजल गावडे | Updated: October 7, 2020 16:00 IST2020-10-07T15:58:27+5:302020-10-07T16:00:04+5:30

बिग बॉस १४च्या आगामी भागात घरातले सर्व निक्की तांबोळीच्या विरोधात लढताना दिसणार आहेत.

Bigg Boss 14: Nikki Tamboli's flirtations will bring breath to family | Bigg Boss 14 : निक्की तांबोळीचे नखरे घरातल्यांच्या नाकात आणणार दम, पवित्रा पुनियासोबत होणार हातापाई

Bigg Boss 14 : निक्की तांबोळीचे नखरे घरातल्यांच्या नाकात आणणार दम, पवित्रा पुनियासोबत होणार हातापाई

बिग बॉसचा चौदावा सीझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आज बिग बॉसला सुरूवात होऊन फक्त चार दिवस उलटले आहेत आणि घरात जबरदस्त घमासान सुरू झाले आहे. एकीकडे घरातील सदस्य बिग बॉसच्या घरात रुळत आहेत तर दुसरीकडे निक्की तांबोळीचे नखरे संपण्याचे नावच घेत नाहीत. निक्की तांबोळीच्या नखऱ्यांमुळे बिग बॉसच्या घरात नवीन युद्धाला सुरूवात झाली आहे. या युद्धात घरातील सर्व सदस्य निक्की तांबोळीच्या विरोधात उभे राहिले आहेत. बिग बॉस १४चा नुकताच रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये घरातील सर्व निक्की तांबोळीला खरीखोटी सुनावताना दिसत आहेत.


खरेतर आगामी भागात जेवणाच्या वाटणीला घेऊन निक्की तांबोळी आणि घरातल्यांमध्ये वाद होताना पहायला मिळणार आहे. सर्व घरातल्यांच्या सहमतीने गौहर खानला ७ फूड आयटमची नाव सांगायची आहेत. तिथे निक्की तांबोळी खूप मनमानी करते. निक्कीचे वर्तणूक पाहून घरातील सदस्य खूप भडकले. त्यानंतर रुबीना दिलाइक, गौहर खान, एजाज खान आणि पवित्रा पुनियासोबत घरातले सर्व जण निक्की तांबोळीवर चिडले.

रुबीना दिलाइक, अभिनव शुक्ला, एजाज खान, जॅस्मिन भसीन, निकिता तांबोली, निशांत मलकानी, शहजाद देओल, सारा गुरपाल, जान कुमार शानू, पवित्रा पुनिया, राहुल वैद्य यांनी आतापर्यंत घरात प्रवेश केला आहे. याशिवाय सिद्धार्थ शुक्ला, गौहर खान आणि हिना खान तुफानी सीनियर्स म्हणून 14 दिवसांसाठी बिग बॉसच्या या सीझनमध्ये दिसतील. सिद्धार्थ शुक्ला 13 व्या सीझनचा व्हिनर आहे. तर हिना खान 12 ची फर्स्ट रनअप आहे. सिद्धार्थ शुक्लाकडे बेडरूमचा, तर गौहर खानचा किचनवर कंट्रोल असेल. स्पर्धकांच्या पर्सनल गोष्टी हिनाच्या ताब्यात असतील.


 

Web Title: Bigg Boss 14: Nikki Tamboli's flirtations will bring breath to family