Bigg Boss 14: हिना खानने बिग बॉसच्या घरात 2 आठवडे राहण्यासाठी घेतली इतकी मोठी रक्कम !
By गीतांजली | Updated: October 12, 2020 17:10 IST2020-10-12T17:01:15+5:302020-10-12T17:10:22+5:30
'बिग बॉस 14'मध्ये दोन आठवडे राहण्यासाठी हिना खानला तगडी रक्कम मिळाली आहे.

Bigg Boss 14: हिना खानने बिग बॉसच्या घरात 2 आठवडे राहण्यासाठी घेतली इतकी मोठी रक्कम !
बिग बॉस 14 मध्ये हिना खान, सिद्धार्थ शुक्ला आणि गौहर खान तुफानी सीनिअस म्हणून सहभागी झाले आहेत, जे याआधीच्या सीझनमध्ये सहभागी झाले होते. तुफानी सीनिअर्सनी बिग बॉसच्या घरात सहभागी होण्यासाठी किती पैसे घेतले आहेत? रिपोर्टनुसार आतापर्यंत सिद्धार्थ शुक्लाला सर्वाधिक मानधन मिळाले होते मात्र मिळालेल्या माहितीनुसार सिद्धार्थ पेक्षा जास्त मानधन हिना खानने घेतले आहे.
हिना खानला मिळालं सगळ्यात जास्त मानधन?
एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार 'बिग बॉस 14'मध्ये दोन आठवडे राहण्यासाठी हिना खानला तगडी रक्कम मिळाली आहे. बिग बॉसच्या घरातील उर्वरित खर्चासह हिना खानला दोन आठवडे घरात राहण्यासाठी 72 लाख देण्यात आल्याचे असल्याचे सांगितले जात आहे. मात्र याबाबत ना बिग बॉसच्या मेकर्सनी ना हिना खानने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. या हंगामात बिग बॉससह मागील बिग बॉस हंगामातील स्पर्धकही दोन आठवड्यांसाठी या घराचा भाग म्हणून आले आहेत.
हिनान 'ये रिश्ता क्या कहलाता' मालिकेतून घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने साकारलेली ‘अक्षरा बहु’ प्रेक्षक आजही विसरले नाहीत. हिना सोशल मीडियावरील लोकप्रिय स्टार आहे. तिला इन्स्टाग्रामवर बरेच फॅनफॉलोईंग आहे. आपले फोटो आणि व्हिडीओ ती नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असते.
PHOTOS: हिना खानने शेअर केलं लेटेस्ट फोटोशूट, दिसली स्टायलिश अंदाजात