तू म्हणशील तसं... राहुल वैद्यची ‘दिशा’ ठरली; लवकरच बांधणार लगीनगाठ, घरी येणार ‘बिग बॉस’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 12:58 IST2021-03-04T12:56:50+5:302021-03-04T12:58:31+5:30

होय, राहुल लवकरच दिशा परमारसोबतलग्नगाठ बांधणार आहे. या लग्नाची सध्या जय्यत तयारी सुरु आहे.

bigg boss 14 contestant rahul vaidya and his girlfriend disha parmar to tie knot in 3 to 4 months | तू म्हणशील तसं... राहुल वैद्यची ‘दिशा’ ठरली; लवकरच बांधणार लगीनगाठ, घरी येणार ‘बिग बॉस’

तू म्हणशील तसं... राहुल वैद्यची ‘दिशा’ ठरली; लवकरच बांधणार लगीनगाठ, घरी येणार ‘बिग बॉस’

ठळक मुद्दे‘इंडियन आयडल’ शोमुळेमुळे प्रकाशझोतात आलेल्या राहुल वैद्यने अभिनयात सुद्धा नशीब आजमावले आहे. 2016मध्ये राहुलने एक इंडो बांग्लादेशी सिनेमा साईन केला होता.

बिग बॉस 14 चा स्पर्धक राहुल वैद्यला भलेही ट्रॉफी जिंकू शकला नाही. पण पे्रक्षकांची मनं जिंकण्यात तो यशस्वी ठरला. ‘बिग बॉस 14’नंतर राहुलची लोकप्रियता चांगलीच वाढली आहे. तो जिथे जाईल तिथे चाहत्यांची गर्दी दिसतेय. तूर्तास राहुल लग्नाच्या तयारीत बिझी आहे. होय, दिशा परमारसोबत राहुल लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. या लग्नाची सध्या जय्यत तयारी सुरु आहे.

‘बिग बॉस 14’च्या घरातच राहुल वैद्यने दिशाला प्रपोज केले होते. यानंतर फिनाले वीकमध्ये खुद्द दिशा ‘बिग बॉस 14’च्या घरात आली होती आणि तिने राहुलला लग्नाला होकार दिला होता. येत्या जून महिन्यात राहुल व दिशा लग्नबंधनात अडकणार, अशी तूर्तास चर्चा आहे. मात्र अद्याप लग्नाची तारीख ठरलेली नाही. लग्नात कुटुंबातील काही लोक व मोजके लोक सहभागी व्हावेत, अशी राहुलची इच्छा आहे. यानंतर फिल्म इंडस्ट्रीच्या लोकांसाठी तो एक ग्रँड रिसेप्शन देणार आहे.

राहुलची होणारी पत्नी दिशा ही सुद्धा टीव्ही इंडस्ट्रीचा एक लोकप्रिय चेहरा आहे. आपल्या ग्लॅमरस फोटोंमुळे ती नेहमी चर्चेत असते. ‘प्यार का दर्द’ या टीव्ही शोमध्ये दिशाने काम केले आहे. दिशा व राहुलची पहिली भेट ‘याद तेरी’ या म्युझिक व्हिडीओच्या निमित्ताने झाली होती. या व्हिडीओनंतर दोघांच्या डेटींगच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. दिशा टीव्ही सीरियल ‘तू अपना सा’मध्ये दिसली होती. 

‘इंडियन आयडल’ शोमुळेमुळे प्रकाशझोतात आलेल्या राहुल वैद्यने अभिनयात सुद्धा नशीब आजमावले आहे. 2016मध्ये राहुलने एक इंडो बांग्लादेशी सिनेमा साईन केला होता. या सिनेमात राहुल वैद्यने बंगाली कलाकार रिया चटर्जी आणि रिया सेनसोबत काम केले होते. राहुल वेद्यने अनेक म्युझिक अल्बमला आवाज दिला आहे. राहुल बॉलिवूडमध्ये अनेक गाणी गायली आहेत. 

Web Title: bigg boss 14 contestant rahul vaidya and his girlfriend disha parmar to tie knot in 3 to 4 months