Bigg Boss 12 : मेघा धाडे झाली बिग बॉस 12 मधून आऊट, बिग बॉसने दिला स्पर्धकांना हा झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 17:00 IST2018-12-08T16:58:31+5:302018-12-08T17:00:55+5:30

या आठवड्यात बिग बॉसने चांगलाच धक्का दिला. या आठवड्यात डबल एलिमिनेशन करण्यात आले आणि या एलिमिनेशनमध्ये दोन मुलींना घराच्या बाहेर पडावे लागले.

Bigg Boss 12: Jasleen Matharu and Megha Dhade are ELIMINATED from the show | Bigg Boss 12 : मेघा धाडे झाली बिग बॉस 12 मधून आऊट, बिग बॉसने दिला स्पर्धकांना हा झटका

Bigg Boss 12 : मेघा धाडे झाली बिग बॉस 12 मधून आऊट, बिग बॉसने दिला स्पर्धकांना हा झटका

ठळक मुद्देबिग बॉस 12 मधून मेघा धाडे आणि जसलीन मथारू हे नुकतेच आऊट झाले आहेत. मेघा धाडे ही बिग बॉस मराठीची विनर आहे

बिग बॉसच्या घरातून दर आठवड्याला कोणता ना कोणता स्पर्धक बाहेर पडतो. पण गेल्या आठवड्यात कोणताच स्पर्धक घरातून बाहेर पडला नव्हता. यंदाच्या आठवड्यात आपण एलिमिनेशन करणार नाही आहोत असे या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक सलमान खानने सगळ्या स्पर्धकांना विकेंड का वारमध्ये सांगितले होते. त्यामुळे घरातील सगळेच स्पर्धक प्रचंड खूश होते. पण या स्पर्धकांना या आठवड्यात बिग बॉसने चांगलाच धक्का दिला. या आठवड्यात डबल एलिमिनेशन करण्यात आले आणि या एलिमिनेशनमध्ये दोन मुलींना घराच्या बाहेर पडावे लागले.

बिग बॉस 12 मधून मेघा धाडे आणि जसलीन मथारू हे नुकतेच आऊट झाले आहेत. मेघा धाडे ही बिग बॉस मराठीची विनर आहे तर जसलीनचे नाव कार्यक्रमाच्या सुरुवातीला अनुप जलोटा यांच्यासोबत जोडण्यात आले असल्याने तिच्या नावाची चांगलीच चर्चा झाली होती. मेघाला बिग बॉस मराठीमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली आणि त्याचमुळे तिला बिग बॉस 12 च्या घरात पाठवण्यात आले होते. बिग बॉस या कार्यक्रमाच्या प्रत्येक सिझनचा टिआरपी खूपच चांगला असतो. पण यंदाच्या सिझनला तितकासा टिआरपी मिळत नसल्याने टिआरपी मिळवण्यासाठी या कार्यक्रमाची टीम जोरदार प्रयत्न करत होती. त्यामुळेच मेघा धाडेला 36 व्या दिवशी बिग बॉसच्या घरात प्रवेश देण्यात आला असल्याचे म्हटले जाते. मात्र ग्रँड फिनालेला काहीच दिवस बाकी असताना तिला या कार्यकर्मातून बाहेर पडावे लागले. 

बिग बॉसच्या या सिझनमध्ये काही स्पर्धक जोड्यांमध्ये असून विचित्र जोड्या अशी या सिझनची थिम आहे. या सिझनमध्ये सेलिब्रेटींसोबत सामान्य लोकांना देखील प्रवेश देण्यात आलेला आहे. सहा जोड्या आणि पाच सोलो स्पर्धक बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवशी दाखल झाले होते. आता यामधून केवळ आठ स्पर्धक शिल्लक राहिले आहे. करणवीर बोहरा, श्रीशांत, दीपिका कक्कर यांसारखे सेलिब्रेटी सध्या बिग बॉसच्या घरात दिसत आहेत. हे तिघेही या सिझनच्या विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जातात. 

Web Title: Bigg Boss 12: Jasleen Matharu and Megha Dhade are ELIMINATED from the show