Bigg Boss 12: अनुप जलोटा यांना पश्चाताप! म्हणे,‘बिग बॉस’च्या घरात जावून माझे आर्थिक नुकसान झाले!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2018 15:56 IST2018-11-04T15:54:55+5:302018-11-04T15:56:38+5:30

होय,  ‘बिग बॉस 12’मध्ये जावून माझे आर्थिक नुकसान झाले, असे त्यांनी म्हटले आहे.

 Bigg Boss 12: anup jalota says he came under financial loss due to bigg boss 12 | Bigg Boss 12: अनुप जलोटा यांना पश्चाताप! म्हणे,‘बिग बॉस’च्या घरात जावून माझे आर्थिक नुकसान झाले!!

Bigg Boss 12: अनुप जलोटा यांना पश्चाताप! म्हणे,‘बिग बॉस’च्या घरात जावून माझे आर्थिक नुकसान झाले!!

भजन सम्राट अनुप जलोटा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. अनुप यांनी जसलीन मथारु या आपल्या शिष्येसोबत ‘बिग बॉस 12’मध्ये एन्ट्री घेतली आणि आम्ही दोघेही गत तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहोत, असे सांगून एकच धमाका केला. अर्थात  ‘बिग बॉस 12’च्या घरात अनुप व जसलीन यांच्यातील केमिस्ट्री कुठेही दिसली नाही. असे का? याचा खुलासा अनुप यांनी घराबाहेर आल्यावर केला. जसलीन माझी गर्लफ्रेन्ड नाही. ते फक्त बिग बॉससाठी केलेले नाटक होते. ती माझी फक्त आणि फक्त शिष्या आहे, असा खुलासा अनुप यांनी केला. आता मात्र अनुप जलोटा यांनी एक वेगळाच सूर लावला आहे. होय,  ‘बिग बॉस 12’मध्ये जावून माझे आर्थिक नुकसान झाले, असे त्यांनी म्हटले आहे.
अनुप जलोटा अलीकडे एका टीव्ही शोमध्ये गेस्ट म्हणून आलेत. यावेळी त्यांना  ‘बिग बॉस 12’बद्दल विचारण्यात आले. यावर बोलताना,  ‘बिग बॉस 12’च्या घरातील अनुभव चांगला होता. पण या शोमुळे माझे बरेच आर्थिक नुकसान झालेत. माझे अनेक कार्यक्रम रद्द झालेत, असे ते म्हणाले.
 ‘बिग बॉस 12’च्या घरात जसलीनसोबत डेटवर गेल्यानंतर तुम्ही हे नाते का नाकारले? असा प्रश्नही त्यांना केला गेला. यावर पुन्हा एकदा जसलीन आपली शिष्या असल्याचा दावा तिने केला. ते नाते म्युझिकल होते. मी तिचा गुरु आहे. आमच्यात कुठलेही प्रेमसंबंध नाहीत, असे ते म्हणाले. अर्थात यावेळी मी भजन गातो याचा अर्थ मी काही संत नाही. सामान्य माणसारखे माझेही आयुष्य आहे. मी एक गायक आहे. मी भोजपुरी ते बॉलिवूडसाठी गाणी गायली आहेत, हे सांगायला ते विसरले नाहीत.
तूर्तास ‘बिग बॉस’च्या घरात असलेली जसलीन अनुप यांच्यावर नाराज आहे. मध्यंतरी हिना खान बिग बॉसच्या घरात गेली असता, तिने जसलीनला अनुप जलोटा बाहेर येऊन काय बोललेत, हे सांगितले होते. यावर जसलीन चांगलीच भडकली होती. मी व अनुप जलोटा रिलेशनमध्ये आहोत. मी त्यांच्यासोबत राहिली आहे, डेटवर जाते,त्यांना किस करते. हे म्युझिकल रिलेशन कसे? असा प्रश्न तिने केला आहे.

Web Title:  Bigg Boss 12: anup jalota says he came under financial loss due to bigg boss 12