'अंगात त्राण राहिला नाही'; ४ दिवसांपासून हिना खान हॉस्पिटलमध्ये ॲडमिट, अभिनेत्रीला झालं तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 08:51 AM2023-12-29T08:51:44+5:302023-12-29T08:52:19+5:30

Hina khan:हिनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तिचे हॉस्पिटलमधले काही फोटो शेअर केले आहेत.

bigg-boss-11-fame-actress-hina-khan-admitted-in-hospital-since-4-days-know-the-reason | 'अंगात त्राण राहिला नाही'; ४ दिवसांपासून हिना खान हॉस्पिटलमध्ये ॲडमिट, अभिनेत्रीला झालं तरी काय?

'अंगात त्राण राहिला नाही'; ४ दिवसांपासून हिना खान हॉस्पिटलमध्ये ॲडमिट, अभिनेत्रीला झालं तरी काय?

'ये रिश्ता क्या कहलाता हैं' या मालिकेच्या माध्यमातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे हिना खान (hina khan). 'बिग बॉस 11', 'कसौटी जिंदगी की  2'  यांसारख्या मालिकांमधूनही ती प्रेक्षकांच्या भेटीला आली. त्यामुळे तिचा चाहतावर्ग अफाट आहे. सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या हिनाने नुकतीच एक पोस्ट शेअर करत ती आजारी असल्याचं सांगितलं आहे. इतकंच नाही तर सध्या ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे.

हिनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तिचे हॉस्पिटलमधले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने थर्मामीटचा एक फोटो शेअर केलाय ज्यात तिला १०२ डिग्रीपेक्षा जास्त ताप असल्याचं दिसून येत आहे. तसंच एका फोटोमध्ये तिच्या हाताला सलाइन लावल्यांचही दिसून येत आहे.

हिनाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती हॉस्पिटलच्या बेडवर बसली असून खिडकीतून बाहेर पाहात आहे.  "खूप जास्त ताप असल्यामुळे मागील ४ रात्री अत्यंत त्रासदायक गेल्या आहेत. ताप कमी व्हायचं नाव घेत नाहीये. सातत्याने १०२-१०३ डिग्रीवरच आहे. अंगात आता काहीच त्राण राहिलेला नाही", असं कॅप्शन देत हिनाने तिच्या हॉस्पिटलचे फोटो शेअर केले आहेत.

पुढे ती म्हणते, "मी नक्की परत येईन. इन्शाअल्लाह. प्लीज, तुमचं प्रेम असंच राहू देत. एकाच वेळी औषधांचे अनेक डोस, सूजलेले हात, कुठे जागा शिल्लक आहे?. आजारपण आणि थकवा."

दरम्यान, हिनाची ही पोस्ट पाहिल्यावर चाहते भलतेच काळजीच पडले आहेत. अनेकांनी तिला लवकर बरी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच काळजी घेण्याचाही सल्ला दिला आहे.

Web Title: bigg-boss-11-fame-actress-hina-khan-admitted-in-hospital-since-4-days-know-the-reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.