'बिग बॉस 11' ची स्पर्धक बंदगी कालराही झळकणार बॉलिवूड सिनेमात, त्यासाठी घेतेय इतकी मेहनत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 14:55 IST2019-04-16T14:49:43+5:302019-04-16T14:55:13+5:30

बिग बॉसच्या घरात सुरू झालेली बंदगी आणि पुनीशची लव्हस्टोरी आजही कायम आहे. दोघांमध्ये प्रेमाचं घट्ट नातं निर्माण झालं आहे

'Bigg Boss 11' Ex Contestant Bandagi Kalra Will Be seen in a Bollywood Movie | 'बिग बॉस 11' ची स्पर्धक बंदगी कालराही झळकणार बॉलिवूड सिनेमात, त्यासाठी घेतेय इतकी मेहनत

'बिग बॉस 11' ची स्पर्धक बंदगी कालराही झळकणार बॉलिवूड सिनेमात, त्यासाठी घेतेय इतकी मेहनत

'बिग बॉस सीझन-11' ची स्पर्धक बंदगी कालराही आता बॉलिवूडमध्ये एंट्री करण्यासाठी सज्ज झाली आहे. बिग बॉस शोनंतर बंदगी ख-या अर्थाने प्रकाशझोतात आली. मात्र त्यानंतर फारशी तिची चर्चा झाली नाही. मात्र बंदगी लवकरच धमाकेदार कमबॅक करणार आहे. कारण बंदगीला बॉलिवूड सिनेमाची लॉटरी लागली आहे. लवकरच ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या सिनेमासाठी सध्या बंदगी खूप मेहनतही घेत आहे. सोशल मीडियावर नजर टाकल्यास तुम्हाला तिचे वर्कआऊट करताने व्हिडिओ पाहून याची प्रचिती येईलच.बंदगी कोणत्या बॉलिवूड सिनेमात झळकणार हे अजून गुलदस्त्याच ठेवले आहे. वेळ येताच स्वतः बंदगी चाहत्यांना सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे. 


 

काही दिवसांपूर्वीच बंदगीचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर सुपरहिट ठरला होता. या व्हिडीओमध्ये बंदगी डीजे स्नेकच्या गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळाली होती. डीजे स्नेकच्या ताकी ताकी या गाण्यावर बंदगीने बेधुंद होऊन कुणालाही घायाळ करेल असा बोल्ड परफॉर्मन्स  दिला होता. 


बिग बॉसच्या घरात सुरू झालेली बंदगी आणि पुनीशची लव्हस्टोरी आजही कायम आहे. दोघांमध्ये प्रेमाचं घट्ट नातं निर्माण झालं आहे. काही दिवसांपूर्वी बंदगी आणि पुनीतचा एक म्युझिक व्हिडीओ रिलीज झाला होता.

'लव्ह मी' या व्हिडीओमध्ये बंदगी कालरा आणि पुनीशची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. खुशबू ग्रेवाल आणि मीत ब्रदर्सनी हे गाणं गायलं होतं. 

Web Title: 'Bigg Boss 11' Ex Contestant Bandagi Kalra Will Be seen in a Bollywood Movie