'प्रेमाची गोष्ट'मध्ये मोठा ट्विस्ट; सावनीच्या खुलाश्यानंतर मुक्ता मोडणार सागरसोबतचं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2023 18:01 IST2023-12-26T18:00:41+5:302023-12-26T18:01:00+5:30

Premachi Goshta : सईवरील प्रेमापोटी मुक्ता आणि सागर लवकरच विवाहबद्ध होऊन नव्या प्रवासाला सुरूवात करणार आहे. दरम्यान आता मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. सावनी लग्न मंडपात येऊन लग्न थांबवण्याचा प्रयत्न केला.

Big Twist in 'Premachi Goshta'; Mukta's marriage with Sagar will break after Sawani's disclosure | 'प्रेमाची गोष्ट'मध्ये मोठा ट्विस्ट; सावनीच्या खुलाश्यानंतर मुक्ता मोडणार सागरसोबतचं लग्न

'प्रेमाची गोष्ट'मध्ये मोठा ट्विस्ट; सावनीच्या खुलाश्यानंतर मुक्ता मोडणार सागरसोबतचं लग्न

स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट (Premachi Goshta) मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले. या मालिकेत सध्या लगीनघाई पाहायला मिळत आहे. सईवरील प्रेमापोटी मुक्ता आणि सागर लवकरच विवाहबद्ध होऊन नव्या प्रवासाला सुरूवात करणार आहे. दरम्यान आता मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. सावनी लग्न मंडपात येऊन लग्न थांबवण्याचा प्रयत्न केला. 

मालिकेत मुक्ता आणि सागरच्या लग्नाच्या विधीला सुरुवात होते आणि तितक्यात तिथे सावनी लग्न थांबवते. मुक्ताला सांगते याच्यासोबत लग्न करू नकोस. मुक्ताची आई सावनीला सांगते की, तुझे सागरबद्दल काहीही हेवेदेवे असतील ते तुझ्याकडे  ठेव. आता आमचे त्याच्याबद्दलचं मत बदलले आहे. त्यानंतर सावनी सगळ्यांना सांगते की सागरला ११ वर्षांचा मुलगा आहे. त्याला हा खूप मारहाण करायचा. या शिवाय सागरने त्या मुलाला कशाप्रकारे मारले आणि कोर्टात त्याने सावनीची कशी बाजू घेतली, असे अनेक खुलासे भर मंडपात करणार आहे. त्यामुळेच आता मुक्ता लग्नाला नकार देताना पाहायला मिळणार आहे. 

मुक्तासह संपूर्ण कुटुंब मंडपातून निघून जाताना दिसणार आहे. पण मुक्ता-सागर यांचे लग्न होण्यासाठी अर्जुन-सायली मध्यस्थी करणार आहेत. सायली मुक्ताला सागरबरोबर लग्न करण्यासाठी समजवताना दिसणार आहे. पण सायलीचे म्हणणे मुक्ता ऐकणार का आणि सागरसोबत लग्न करेल का, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

Web Title: Big Twist in 'Premachi Goshta'; Mukta's marriage with Sagar will break after Sawani's disclosure