'आई कुठे काय करते' मालिकेत मोठा ट्विस्ट; अरुंधती करणार आशुतोषसोबत लग्न?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2021 18:40 IST2021-11-27T18:39:27+5:302021-11-27T18:40:02+5:30

आई कुठे काय करतेमध्ये लवकरच नवीन मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

The big twist in the ‘Aai Kuthe Kay Karte’ series; Will Arundhati marry Ashutosh? | 'आई कुठे काय करते' मालिकेत मोठा ट्विस्ट; अरुंधती करणार आशुतोषसोबत लग्न?

'आई कुठे काय करते' मालिकेत मोठा ट्विस्ट; अरुंधती करणार आशुतोषसोबत लग्न?

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेमध्ये लवकरच नवीन मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आश्रमाच्या दीपोत्सव कार्यक्रमात तिची भेट महाविद्यालयातील मित्र आशुतोष केळकरची भेट होते. एका अपघातातून यशला आशुतोष वाचवतो. त्यानंतर तो आशुतोषला गाण्याची ऑफर देतो. यश आणि ईशाच्या सांगण्यावरून अरूंधती ऑफर स्वीकारते. मात्र तिला देशमुख कुटुंबातील कांचन, अनिरुद्ध आणि अभिषेक तीव्र विरोध करतात. त्यावरून सातत्याने वाद होताना पाहायला मिळतात. 

एका संकेतस्थळाच्या रिपोर्ट्सनुसार, मालिकेच्या कथानकानुसार,आगामी काही भागांमध्ये देशमुख कुटुंबियांमध्ये आशुतोषमुळे मोठे वादळ निर्माण होणार आहे. कांचन, अनिरुद्ध ,संजना अरुंधतीचा वाईट विचार करून तिच्या आणि आशुतोष यांच्या नात्याबद्दल संशय घेतील. यामुळे अरुंधतीला खूप वाईट वाटेल. आप्पांचा अरुंधतीवर विश्वास असेल, पण घरात पुढे होणारे वाद टाळण्यासाठी आप्पा अरुंधतीला घरातून निघून जायला सांगतील. अरुंधती देशमुख कुटुंबाचे घर कायमचे सोडण्याचा निर्णय घेईल. पण तिचा निर्णय ठाम असेल. अरुंधती आईकडे काही दिवस राहिल आणि त्यानंतर ती भाड्याने घर घेईल. तर दुसरीकडे संजना आणि अनिरुद्ध समृद्धी बंगला त्यांच्या नावावर करण्याची विनंती करतील. यापुढे संजना अरुंधतीची जागा घेईल असं कांचन आप्पांना सांगेल. आप्पांचे मन या गोष्टीला तयार नसतं. पुढे संजना अनिरुद्ध यांच्या नावावर घर करा, असे कांचन आप्पांना सांगेल. अरुंधती कडून आप्पा घराचे पेपर सही करून घेतील. त्यामुळे देशमुख कुटुंबीय आणि असलेले घर समृद्धी बंगल्यावरील अरुंधतीचा हक्क राहणार नाही. 

अरूंधतीला सोडावं लागणार घर...
जेव्हा आशुतोषला समजते की त्याच्यामुळे अरूंधतीला घर सोडावे लागले. तेव्हा तो समृद्धी बंगल्यात येऊन माझ्यामुळे अरूंधतीला काही दोष देऊ नका असे सांगतो. तेव्हा कांचन आणि अनिरूद्ध त्याचे ऐकत नाही. त्यावर तो त्याचे एकतर्फी अरूंधतीवर प्रेम असल्याचे सांगतो. तुम्हाला काय बोलायचे असेल ते मला बोला. तिला दोष देऊ नका, अस आशुतोष सर्वांना सांगेल. हे अरुंधती सर्व घराबाहेर राहून ऐकते. त्यानंतर पुढे अरुंधती तुझं माझ्यावर प्रेम का? असे आशुतोषला विचारते. आशुतोष पण त्याचे प्रेम कबुल करतो. दोघेही एकमेकांसमोर भावना व्यक्त करून मोकळ्या गप्पा करतील. दोघांच्या मैत्रीची येथे नवीन सुरुवात होईल. पुढे एका समारंभात कांचन, अरुंधती, आशुतोष आमने-सामने येतील. कांचन आशुतोषला सर्वांसमोर सुनावते. तुमच्यात मैत्री आहे पण तुमच्या नात्याला नाव नाही. आशुतोष तुझे अरुंधती वर प्रेम आहे. समाजात तुमच्या बद्दल चर्चा आहे. तिच्या कपाळाला कुंकू लावून तुझी बायको कर आणि संपून टाक सगळ्या चर्चा. आता आशुतोष अरुंधतीसोबत लग्न करेल का, हे आगामी भागातच कळेल.

Web Title: The big twist in the ‘Aai Kuthe Kay Karte’ series; Will Arundhati marry Ashutosh?