'बिग बॉस मराठी ६'बद्दल क्रिएटिव्ह हेडचा खुलासा, म्हणाले "एक सिक्रेट रिव्हिल करतो की..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 13:25 IST2025-12-23T13:23:38+5:302025-12-23T13:25:44+5:30
'बिग बॉस हिंदी'चा सीझन संपल्यानंतर आता चाहत्यांना 'बिग बॉस मराठी ६'ची उत्सुकता आहे.

'बिग बॉस मराठी ६'बद्दल क्रिएटिव्ह हेडचा खुलासा, म्हणाले "एक सिक्रेट रिव्हिल करतो की..."
'बिग बॉस हिंदी'चा सीझन संपल्यानंतर आता चाहत्यांना 'बिग बॉस मराठी ६'ची उत्सुकता आहे. 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनचा प्रोमोही प्रदर्शित करण्यात आला आहे. 'बिग बॉस मराठी ५'प्रमाणे 'बिग बॉस मराठी ६'चं सूत्रसंचालनही रितेश देशमुख करणार आहे. या नव्या सीझनबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. या नव्या सीझनची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असतानाच 'बिग बॉस मराठी ६'च्या क्रिएटिव्ह हेड केतन माणगावकर यांनी घरातील सर्वात मोठ्या 'सिक्रेट'चा उलगडा केला आहे.
'बिग बॉस मराठी'चे क्रिएटिव्ह हेड केतन माणगावकर यांनी रेडिओ सिटी मराठीला मुलाखत दिली. यावेळी, "यंदाची थीम स्वर्ग-नरक थीम असेल का?" असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ते म्हणाले, "नाही! असं नाहीये…जो पहिला टीझर आला होता, त्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की एक दार उघडलं होतं. यंदाच्या सीझनमध्ये घराच्या आत अनेक दरवाजे असतील. रितेश सरांनी प्रोमोमध्ये म्हटल्याप्रमाणे, 'दार उघडणार आणि गेम पालटणार...' हे यंदाचं खरं वैशिष्ट्य आहे".
पुढे ते म्हणाले, "एक सिक्रेट रिव्हिल करतो, यावेळी घराच्या आत खूप दरवाजे असतील. आता ते दरवाजे किती असतील, नेमकं काय असेल ते रितेश सरांच्या पुढच्या प्रोमोमध्ये तुम्हाला कळेल. प्रत्येक दारामागे काही ना काही सरप्राइज, ट्विस्ट आणि वेगळं काहीतरी चॅलेंज असेल. हा सीझन तुम्हाला वेड लावणार इतकं नक्की! बास मी एवढंच सांगेन".
कधी आणि कुठे पाहायला मिळणार?
'बिग बॉस मराठी'चा हा बहुप्रतीक्षित सहावा सीझन ११ जानेवारीपासून दररोज रात्री ८ वाजता कलर्स मराठी टीव्हीवर आणि जिओ हॉटस्टार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाबद्दल सांगायचं तर, या पर्वात सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर आणि कलाकार सहभागी झाले होते. सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता झालेला. तर अभिजित सावंत उपविजेता ठरलेला.