अरुण गवळीचा जावई आहे बिग बॉस मराठी ३ सिझनचा हा स्पर्धक, जाणून घ्या खास गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 01:28 PM2021-09-21T13:28:50+5:302021-09-21T13:33:11+5:30

रिल लाईफबद्दल माहिती असले तरी रिअल लाईफबद्दल फारशा गोष्टी चाहत्यांना माहिती नसतात. बिग बॉस मराठी ३ शोमध्ये झळकत असलेला अक्षय वाघमारे हा अरु गवळी यांचा जावयी आहे.

Big Boss Marathi 3's this contestant is Son in Law of Arun Gawli, check details | अरुण गवळीचा जावई आहे बिग बॉस मराठी ३ सिझनचा हा स्पर्धक, जाणून घ्या खास गोष्टी

अरुण गवळीचा जावई आहे बिग बॉस मराठी ३ सिझनचा हा स्पर्धक, जाणून घ्या खास गोष्टी

googlenewsNext

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पाहिल्याच दिवशी नॉमिनेशन टास्क पार पडला आणि सदस्यांनी त्यांच्या नजरेत कोण टिकाऊ आणि कोण टाकाऊ आहे हे सांगितले. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये प्रत्येक सदस्याची दर दिवशी वेगवेगळी रूप बघायला मिळतात. कधी कधी जुन्या भेटीगाठी देखील समोर येतात.आता स्पर्धकांच्या काही खास गोष्टीही चाहत्यांना जाणून घ्येण्यात रस असतो. रिल लाईफबद्दल माहिती असले तरी रिअल लाईफबद्दल फारशा गोष्टी चाहत्यांना माहिती नसतात. बिग बॉस मराठी ३ शोमध्ये झळकत असलेला अक्षय वाघमारे हा अरु गवळी यांचा जावई आहे. 

अभिनयाप्रमाणे अक्षय फिटनेसासाठीही ओळखला जातो. सोशल मीडियावर नजर टाकल्यास त्याचे वर्कआऊट व्हिडीओ फोटो पाहयाला मिळतील. इतका तो फिटनेस फ्रिक आहे. फिटनेसकडे तो अजिबात दुर्लक्ष करत नाही. लॉकडाऊनच्या काळातही तो व्यायाम करतानाचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत होता.मेहनतीने त्याने पिळदार बॉडी कमावली आहे. अक्षय त्याच्या फिटनेस व्हिडिओसाठी सोशल मीडियावर लोकप्रिय आहे.

अक्षयची आणखी एक ओळख म्हणजे तो ज्येष्ठ विनोदी अभिनेते दादा कोंडके यांचा नातू आहे.अक्षय 'फत्तेशिकस्त', 'बेधडक', 'दोस्तीगिरी, 'बस स्टॉप' यांसारख्या सुपरहिट ठरलेल्या मराठी सिनेमांत तो झळकला आहे. 'ती फुलराणी' या मालिकेतही त्याने काम केले होते. 


 
अक्षयने २०२० मध्ये अरुण गवळी यांची मुलगी योगितासह लग्न करत संसार थाटला होता. लॉकडाऊनचे नियम पाळून मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला होता. दगडी चाळीतच दोघांचं लग्न झालं होतं.लग्नात फक्त दोन्हीकडचे कुटंबच उपस्थित होते.

दोघांच्या लग्नाचीहीह प्रचंड चर्चा झाली होती.  २०२१ रोजी अक्षय आणि योगिता यांच्या आयुष्यात गोंडस मुलीचे आगमन झाले होते. अक्षयनेच चाहत्यांना आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केल होती. 

'डॅडीं’चा जावई अर्थात अभिनेता अक्षय वाघमारे आता सगळ्यात वादग्रस्त समजला जाणारा बिग बॉस शोमध्ये झळकतोय. त्यामुळे आगामी काळात तो कशी खेळी खेळणार, रसिकांचे कितपत मनोरंजन करणार हेच पाहणं रंजक असणार आहे.

Web Title: Big Boss Marathi 3's this contestant is Son in Law of Arun Gawli, check details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.