बिग बॉस मराठीमधील हा स्पर्धक आहे दिवंगत अभिनेते दादा कोंडके यांचा नातू,जाणून घ्या खास माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 03:06 PM2021-09-22T15:06:15+5:302021-09-22T15:13:55+5:30

मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाने आणि दर्जेदार चित्रपटांनी भुरळ घालणाऱ्या दादा कोंडके यांची नक्कल करत आज कलाकार रसिकांचे मनोरंजनही करतात.

Big Boss Marathi 3's this Contestant is grand son of this late famous actor Dada Kondke | बिग बॉस मराठीमधील हा स्पर्धक आहे दिवंगत अभिनेते दादा कोंडके यांचा नातू,जाणून घ्या खास माहिती

बिग बॉस मराठीमधील हा स्पर्धक आहे दिवंगत अभिनेते दादा कोंडके यांचा नातू,जाणून घ्या खास माहिती

googlenewsNext

७० ते ८० च्या दशकात अनेक सुपरहिट सिनेमे देणारे बहुरंगी व्यक्तिमत्त्व ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक दादा कोंडके. मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाने आणि दर्जेदार चित्रपटांनी भुरळ घालणाऱ्या दादा कोंडके यांची नक्कल करत आज कलाकार रसिकांचे मनोरंजनही करतात. त्यांना पाहतांना रसिकही दादा कोंडके यांच्या काळातल्या आठवणीत रमताना दिसतात. दादा कोंडके यांच्या सिनेमांचा एक विशिष्ट रसिकवर्ग होता. दादा कोंडके यांच्या चित्रपटावर प्रचंड प्रेम केले. 

अभिनयच नाही तर निर्मितीतही त्यांनी एक से बढकर एक चित्रपटांची  निर्मिती केली. दादांनी एक नाही दोन नाही तर  १६ चित्रपटांची निर्मिती केली होती. या चित्रपटांचे वैशिष्ट्य म्हणजे प्रदर्शित झालेले सगळेच चित्रपट रौप्यमहोत्सवी ठरले. या विक्रमामुळे त्यांचे नाव गिनीज बुकमध्येही नोंदवले गेले होते. मुळात डबल मिनींग डायलॉग त्यांच्या चित्रपटांची खासियत असली तरीही रसिकांनी त्यांच्या सगळ्याच कलाकृती उचलून धरल्या.

दादा कोंडके यांचा अभिनयाचा वारसाही आता पुढची पिढी सांभाळत आहे. फार कमी लोकांना माहिती असेल मराठी अभिनेता अक्षय वाघमारे हा दादा कोंडके यांचा नातू आहे. तर त्याची दुसरी ओळख म्हणजे तो अरुण गवळी यांचा जावईदेखील आहे.

अक्षयने २०२० मध्ये अरुण गवळी यांची मुलगी योगितासह लग्न करत संसार थाटला. लॉकडाऊनचे नियम पाळून मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला होता. दगडी चाळीतच दोघांचं लग्न झालं होतं.लग्नात फक्त दोन्हीकडचे कुटंबच उपस्थित होते.

अभिनयाप्रमाणे अक्षय फिटनेसासाठीही ओळखला जातो. सोशल मीडियावर नजर टाकल्यास त्याचे वर्कआऊट व्हिडीओ फोटो पाहयाला मिळतील. इतका तो फिटनेस फ्रिक आहे. फिटनेसकडे तो अजिबात दुर्लक्ष करत नाही. लॉकडाऊनच्या काळातही तो व्यायाम करतानाचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत होता.मेहनतीने त्याने पिळदार बॉडी कमावली आहे. अक्षय त्याच्या फिटनेस व्हिडिओसाठी सोशल मीडियावर लोकप्रिय आहे.

सध्या तो बिग बॉस मराठी सिझन ३ मध्ये झळकत आहे. अक्षयने 'फत्तेशिकस्त', 'बेधडक', 'दोस्तीगिरी, 'बस स्टॉप' यांसारख्या सुपरहिट ठरलेल्या मराठी सिनेमांत तो झळकला आहे. 'ती फुलराणी' या मालिकेतही त्याने काम केले होते.

Web Title: Big Boss Marathi 3's this Contestant is grand son of this late famous actor Dada Kondke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.