सबकुछ नजर आ रहें है..., ‘Bigg Boss Marathi 3’च्या घरात भलतीच चर्चा, भडकली मीरा!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2021 16:49 IST2021-12-05T16:47:31+5:302021-12-05T16:49:34+5:30
Bigg Boss Marathi 3 video : होय, ‘बिग बॉस मराठी 3’च्या घरात सध्या भलतीच चर्चा सुरू आहे आणि यामुळे मीरा जगन्नाथ चांगलीच अपसेट झालीये.

सबकुछ नजर आ रहें है..., ‘Bigg Boss Marathi 3’च्या घरात भलतीच चर्चा, भडकली मीरा!!
‘बिग बॉस मराठी 3’च्या घरात सध्या भलतीच चर्चा सुरू आहे आणि यामुळे मीरा जगन्नाथ (Meera Jagannath) चांगलीच अपसेट झालीये. होय, मीरा आणि उत्कर्ष शिंदेची (Utkarsh Shinde) वाढती जवळीक पाहून दोघांमध्ये काहीतरी शिजतंय, अशी चर्चा दबक्या आवाजात बिग बॉसच्या घरात सुरू झालीये.
सध्या मीरा आणि उत्कर्षचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओत उत्कर्ष मीराचा हात दाबून देताना दिसतोय आणि तिकडे विकास व सोनाली या दोघांच्या नात्यावर शंका घेताना दिसत आहेत. मीरा व उत्कर्षमध्ये मैत्रीपेक्षा काही तरी जास्त असल्याचं विकास ‘इशारों इशारों में’ सांगतोय. सबकुछ नजर आ रहा है, सुरूवात झालीये, असं तो म्हणतो. यावर, मी आधीच म्हटलं होतं, असं सोनाली म्हणतेय.
मीराच्या टीमने तिच्या इन्स्टा हँडलवर हाच व्हायरल व्हिडीओ शेअर करत ह्याला विकसित बुध्दी म्हणावं की अविकसित? असा सवाल आता केलाय.
‘आपल्या मीराच्या हाताला लागलं आहे ह्याचा तिने इश्शू केला नाही ते बहुतेक तिचं चुकलं. कारण उत्कर्ष तिचा हात दाबून देत होता. फक्त ह्या एकाच व्हिडिओचं आता भांडवल केलं जातं आहे. ह्याला विकसित बुध्दी म्हणावं की अविकसित?मैत्री काय असते ही व्याख्याच मुळात यांना माहित नसावी. काय वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ पाहून?, असा प्रश्न मीराच्या वतीनं या पोस्टमध्ये विचारण्यात आला आहे.
तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी मीरा व उत्कर्षच्या नात्यावर शंका घेणा-या विकास व सोनालीला ट्रोल केलं आहे तर काहींनी यानिमित्ताने मीरालाच आरोपीच्या पिंज-यात उभं केलं आहे.
जिंकण्यासाठी एखाद्याच्या चारित्र्याचे असे वाभाडे काढणे आणि निखळ मैत्रीला असे बदनाम करणे कितपत योग्य आहे. हा विकास नेहमी हेच करत आलाये, अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने दिली आहे. काहींनी हा व्हिडीओ पाहून विकासला शकुनी म्हटलं आहे.
काहींनी मात्र यावरून मीरालाही सुनावलं आहे. मीरा ताई तुम्हीही तेच केलं होतं ना? विशाल व सोनालीबद्दल तुम्ही हेच असंच बोलला होता नाही, अशा शब्दांत एका चाहत्याने मीराचे कान टोचले आहेत. मीरा तू पण भरपूर काही बोलते. स्वत:वर आलं तर लगेच व्हिडीओ, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे.