बिग बॉस मराठी २ : घरात असं काय घडलं की, रूपालीला अश्रू झाले अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 17:03 IST2019-06-18T17:03:18+5:302019-06-18T17:03:47+5:30

रूपालीला परागशी बोलताना अश्रू अनावर झाले. परंतु त्याने रूपालीला सांगितले मी खूप दुखावला गेलो आहे त्यामुळे मी परत येणे अशक्य आहे.

Big Boss Marathi 2: Rupali bhosale become emotional in bigg boss house | बिग बॉस मराठी २ : घरात असं काय घडलं की, रूपालीला अश्रू झाले अनावर

बिग बॉस मराठी २ : घरात असं काय घडलं की, रूपालीला अश्रू झाले अनावर

ठळक मुद्दे परागने अचानक घेतलेल्या या निर्णयाने काय होईल ?

बिग बॉसच्या घरामध्ये वेगवेगळे ग्रुप तयार होताना प्रेक्षकांनी पाहिले. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एक ग्रुप पहिल्या आठवड्यापासून चर्चेत राहिला आणि तो म्हणजे किशोरी, विणा, रुपाली, पराग यांचा ग्रुप कालच्या भागामध्ये परागने बोलताना सांगितले विणा आणि अभिजीत केळकरला नॉमिनेट करणार. पण, काल पार पडलेल्या भागामध्ये परागने किशोरी आणि रुपालीला तो ग्रुप सोडत असल्याचे सांगितले. परागने अचानक घेतलेल्या या निर्णयाने काय होईल ? खरोखरच हा ग्रुप तुटेल ? कि पुन्हा एकदा एकत्र येतील ? परागन त्यांच्या ग्रुपमध्ये अभिजीत बिचुकले, नेहा शितोळे, माधव देवचके, हीना पांचाळ हे असतील असे देखील सांगितले.

आज रुपाली बरीच भावूक झालेली दिसणार आहे. रूपालीला परागशी बोलताना अश्रू अनावर झाले. परंतु त्याने रूपालीला सांगितले मी खूप दुखावला गेलो आहे त्यामुळे मी परत येणे अशक्य आहे. या वेळेस त्याने रुपाली आणि किशोरीला सांगितले, मी अशा लोकांसोबत आहे ज्यांना एकएक करून मला काढायचे होते. मी त्यांना एक गोष्ट सांगितली आहे, मी माझ्याप्रमाणे खेळणार आहे परंतु त्यांच्या ग्रुप विरुद्ध खेळणार नाही. 

 नुकतेच बिग बॉसच्या घरात चौथ्या आठवड्यात महागायिका वैशाली माडे कॅप्टन झाली आहे. बिग बॉसने दिलेल्या ‘सही रे सही’ ह्या टास्कमध्ये जिंकून वैशाली कॅप्टन झाली आहे. वैशालीने फळ्यावर सर्वाधिक ऑटोग्राफ म्हणजेच 276 स्वाक्ष-या करून कार्य जिंकले होते.

Web Title: Big Boss Marathi 2: Rupali bhosale become emotional in bigg boss house