दुसऱ्या डिलिव्हरीनंतर भारती सिंगची झाली अशी अवस्था, रडून रडून कॉमेडी क्वीन हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 11:00 IST2025-12-30T10:59:55+5:302025-12-30T11:00:30+5:30
दुसऱ्या डिलिव्हरीनंतर भारतीला पोस्टपार्टममधून जावं लागत आहे. याबाबत तिने तिच्या नव्या व्लॉगमधून चाहत्यांना माहिती दिली आहे.

दुसऱ्या डिलिव्हरीनंतर भारती सिंगची झाली अशी अवस्था, रडून रडून कॉमेडी क्वीन हैराण
कॉमेडी क्वीन भारती सिंग नुकतीच दुसऱ्यांदा आई झाली आहे. भारतीने १९ डिसेंबरला दुसऱ्या बाळाला जन्म दिला. भारतीला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. तिने व्हिडीओतून लाडक्या काजूची झलकही दाखवली होती. पण, दुसऱ्या डिलिव्हरीनंतर भारतीला पोस्टपार्टममधून जावं लागत आहे. तिला याचा फार त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत तिने तिच्या नव्या व्लॉगमधून चाहत्यांना माहिती दिली आहे.
नव्या व्हिडीओत भारती रडताना दिसत आहे. रडून रडून कॉमेडी क्वीनची अवस्था वाईट झाली आहे. व्हिडीओत भारती म्हणते, "मला नुसतंच रडू येत आहे. माहीत नाही कशामुळे रडू येतंय. पण हल्ली मला नुसतं बसलेलं असलं तरी रडायला येतं. सगळं काही ठीक आहे. घरात प्रत्येक काम करायला माणूस आहे. पण, मला स्वत:लाच समजत नाहीये की मला रडायला का येतंय...माझ्यासोबत हे काय घडतंय. देवाने एवढा आनंद दिलाय पण हे पोस्टपार्टम का होतंय, हे कळत नाही". भारतीच्या या अवस्थेत हर्ष तिची काळजी घेत आहे.
दरम्यान, भारती आणि हर्ष लिंबाचिया यांनी २०१७ मध्ये लग्न केलं होतं. २०२२ मध्ये भारतीने तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिला होता. त्याचं नाव लक्ष असं आहे. त्याला सगळे लाडाने गोला बोलतात. तर भारतीने दुसऱ्या लेकाचं निकनेम काजू असं ठेवलं आहे.