आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 09:29 IST2025-08-13T09:29:01+5:302025-08-13T09:29:50+5:30

मुलगा विचित्र वागायला लागल्याने काही दिवसांपूर्वी भारतीने लाबूबू डॉल जाळली होती.

bharti singh again encountered with labubu doll raj kundra gifted her says this doll is follwoing me | आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."

आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."

सध्या जगभरात लाबूबू डॉल ट्रेंडिंगमध्ये आहे. ही बाहुली शापित असून ज्यांच्याकडे ही डॉल आहे त्यांना वाईट घटनांना सामोरं जावं लागल्याचीही एक चर्चा झाली. 'लाफ्टर क्वीन' भारती सिंहने (Bharti Singh) काही दिवसांपूर्वी लूाबूबू डॉल आणली होती. मात्र तेव्हापासून तिचा मुलगा खूप चिडचिडा, हट्टी आणि आक्रमक वागू लागला होता. यामुळे भारतीने ती बाहुली अक्षरश: जाळून टाकली होती. असा व्हिडिओ तिने शेअर केला होता. आता ती बाहुली परत तिच्यासमोर आली आहे. 

भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांचा पॉडकास्ट आहे. अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या पॉडकास्टवर येऊन गप्पा मारल्या आहेत. नुकताच राज कुंद्रा त्यांच्या सेटवर आला होता. राजने भारतीला लाबूबू डॉल गिफ्ट केली. ते पाहून भारती म्हणाली,"ही गोष्ट माझा पिच्छाच सोडत नाहीये. ही फार महागडी आणि एक निराळीच बाहुली आहे." लाबूबूला पाहिल्यावर भारती निराश होत राजला पुढे म्हणाली, "तू मला ही बाहुली गिफ्ट देऊन योग्य केलं नाहीस. ही राजच्या मेहनतीचं फळ आहे. मी याला जाळू शकत नाही. आता मी हिला कुठेतरी दूर लोणावळ्याला जमिनीत गाडेन."

भारती पुढे म्हणाली, "लाबूबूला जाळल्यानंतर मला अनेक ठिकाणी त्या डॉल मिळाल्या आहेत. मी एका बर्थडे पार्टीला गेले होते तेव्हा तिथेही लाबूबूचीच थीम होती. तर आज राजने मला तीच डॉल गिफ्ट दिली. घरी गेल्यानंतर मी माझ्या मुलाला ती बाहुली दाखवली तर तो खूश झाला आणि म्हणाला, 'चल आता यालाही जाळुया'. 

भारती सिंहसोबत काय घडलं होतं?

गेल्या व्लॉगमध्ये भारती सिंहने आपल्या लेकाच्या विचित्र वागण्याला लाबूबूलाच दोषी ठरवलं होतं. ती म्हणालेली, 'जेव्हापासून आम्ही याला लाबूबू दिली आहे त्याने संयमच हरवला आहे. तो नुसचा चिडतोय, ओरडतोय आणि गोष्टी तोडफोड करतोय. त्याचं वागणं पाहून यामागे ती लाबूबूच आहे असं मला अनेकांनी सांगितलं होतं."

Web Title: bharti singh again encountered with labubu doll raj kundra gifted her says this doll is follwoing me

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.