​‘भाईजान’ आकाशदीपचा शत्रू ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2016 12:56 IST2016-08-12T07:26:21+5:302016-08-12T12:56:21+5:30

'बिग बॉस सीझन-5' चा स्पर्धक आकाशदीप सेहगलनं दबंग सलमान खानवर गंभीर आरोप केलेत. सलमाननं आपलं करियर संपवल्याचा धक्कादायक आरोप ...

Bhaijaan is the enemy of Akashdeep? | ​‘भाईजान’ आकाशदीपचा शत्रू ?

​‘भाईजान’ आकाशदीपचा शत्रू ?

'
;बिग बॉस सीझन-5' चा स्पर्धक आकाशदीप सेहगलनं दबंग सलमान खानवर गंभीर आरोप केलेत. सलमाननं आपलं करियर संपवल्याचा धक्कादायक आरोप आकाशदीपनं केलाय. सीझन-5च्या दरम्यान सलमान आणि आकाशदीपमध्ये काही कारणावरुन वादाची ठिणगी पडली. तोच राग मनात ठेवून सलमान आपल्याबरोबर वाईट पद्धतीने वागत असल्याचा दावा त्यानं केलाय. टीव्हीसृष्टीतून सलमाननं दूर केल्याचाही आरोप आकाशदीपनं केलाय. आपल्याबद्दल सलमाननं इतरांना भडकावलं आणि त्यामुळंच अभिनय क्षमता आणि गुण असूनही काम मिळालं नसल्याचं आकाशदीपनं म्हटलंय. आता आकाशदीपच्या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे हे सलमान आणि त्यालाच माहित. की आकाशदीपचा हा पब्लिसिटी स्टंट तर नाही ना ?

Web Title: Bhaijaan is the enemy of Akashdeep?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.