‘भाभीजी घर पर हैं’ मालिका का सोडली? इतक्या दिवसानंतर सौम्या टंडनने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 16:20 IST2021-12-06T16:20:05+5:302021-12-06T16:20:43+5:30

Bhabi Ji Ghar Par Hai : सौम्यानं ‘भाभीजी घर पर हैं’ मालिका सोडून आता बराच काळ लोटला. अर्थात आत्तापर्यंत तिनं कधीच हा शो सोडण्यामागचं कारण सांगितलं नव्हतं.

Bhabi Ji Ghar Par Hai's Saumya Tandon finally BREAKS SILENCE on quitting the show |  ‘भाभीजी घर पर हैं’ मालिका का सोडली? इतक्या दिवसानंतर सौम्या टंडनने केला खुलासा

 ‘भाभीजी घर पर हैं’ मालिका का सोडली? इतक्या दिवसानंतर सौम्या टंडनने केला खुलासा

भाभीजी घर पर हैं’ (Bhabi Ji Ghar Par Hai) ही टेलिव्हिजनची लोकप्रिय मालिका. या मालिकेतील जुनी गोरी मेम तुम्हाला आठवत असणारच. होय, आम्ही बोलतोय ते अभिनेत्री सौम्या टंडन ( Saumya Tandon ) हिच्याबद्दल. सौम्यानं ही मालिका सोडून बराच काळ लोटला. अर्थात आत्तापर्यंत तिनं कधीच हा शो सोडण्यामागचं कारण सांगितलं नव्हतं.  पण आता तिनं हा शो सोडण्यामागचं कारण सांगितलंय.

भाभीजी घर पर हैं’मध्ये सौम्याने पाच वर्ष काम केलं होतं. तिनं शो सोडल्याचं कळताच चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. सौम्यानं शो का सोडला, हे कळायला मार्ग नव्हता. पण आता ‘इंडियन एक्स्पे्रस’ला दिलेल्या मुलाखतीत सौम्या यावर बोलली.
ती म्हणाली, ‘भाभीजी घर पर हैं या शोमध्ये पाच वर्ष काम करताना खूप मज्जा आली. तो प्रवास फारच सुंदर होता. सेटवर मला काही खूप चांगले मित्र मिळालेत. पण एका टप्प्यावर शो सोडण्याची योग्य वेळ आता आलीये, असं मला वाटायला लागलं होतं. मला काही वेगळे प्रोजेक्ट करायचे होते. माझ्या मते, मी एक थिंकिंग अ‍ॅक्ट्रेस आहे आणि मला रोज टीव्हीवर दिसण्याची गरज नाहीये.’

सौम्यानं शो सोडला त्यावेळी ब-याच अफवा पसरल्या होत्या. मालिकेत अंगुरी भाभीची भूमिका करणाºया शिल्पा श्ािंदेसोबत वाद झाल्यामुळे सौम्याने ही मालिका सोडल्याची चर्चा होती. यावरही सौम्या बोलली. ‘मी मालिका सोडली त्यावेळी अनेक अफवा पसरवल्या गेल्या. निश्चितपणे मला त्या बातम्या वाचून वाईट वाटलं होतं. त्यावेळी मला काहीही बोलण्यास मनाई करण्यात आली होती. त्यामुळे मी बोलले नव्हते. मी एक कलाकार या नात्यानं शो सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यामागे कोणताही वाद नव्हता. मी शो सोडण्याचा निर्णय घेतला आणि टीमनेही मला समजून घेतलं,’असं ती म्हणाली.
सौम्याने शो सोडल्यानंतर गोरी मेम अर्थात अनीता भाभीची भूमिका नेहा पेंडसे साकारते आहे.

Web Title: Bhabi Ji Ghar Par Hai's Saumya Tandon finally BREAKS SILENCE on quitting the show