'भाभीजी घर पर है'मधील मनमोहन तिवारीची खऱ्या आयुष्यातील पत्नी आहे अंगुरी भाभी इतकीच सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 11:41 IST2021-06-11T11:41:23+5:302021-06-11T11:41:55+5:30

गोरी मेम म्हणजचे अंगुरी भाभीवर लट्टू असणाऱ्या मनमोहन तिवारीची खऱ्या आयुष्यातील पत्नीदेखील खूपच सुंदर आहे.

'Bhabhiji Ghar Par Hai' fame Manmohan Tiwari's real life wife is so beautiful | 'भाभीजी घर पर है'मधील मनमोहन तिवारीची खऱ्या आयुष्यातील पत्नी आहे अंगुरी भाभी इतकीच सुंदर

'भाभीजी घर पर है'मधील मनमोहन तिवारीची खऱ्या आयुष्यातील पत्नी आहे अंगुरी भाभी इतकीच सुंदर

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका भाभीजी घर पर हैने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. या मालिकेत अंगुरी भाभीचे मन जिंकण्यासाठी विभूती नारायणच्या सुरु असलेल्या युक्त्या प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग लावतात. तर मनमोहन तिवारीचे गोरी मेम म्हणजेच अनीता भाभीबद्दल असणारे आकर्षण आणि त्याचा लाजरा स्वभाव चाहत्यांना चांगलाच भावतो आहे.

गोरी मेम म्हणजचे अंगुरी भाभीवर लट्टू असणाऱ्या मनमोहन तिवारीची खऱ्या आयुष्यातील पत्नीदेखील खूपच सुंदर आहे. मनमोहन तिवारी म्हणजेच अभिनेता रोहिताश गौड सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि तो सोशल मीडियावर फॅमिलीसोबतचे फोटो शेअर करत असतो.

रोहिताश गौड यांच्या खऱ्या पत्नीचे नाव आहे रेखा गौड. रेखा यादेखील दिसायला सुंदर आहेत. रेखा यांचा अभिनय क्षेत्राची फारसा संबंध नसला तरी सोशल मीडियावर त्या अनेक विनोदी आणि डान्स करतानाचे व्हिडीओ शेअर करत असतात.


रोहिताश आणि रेखा गौड यांना दोन मुली आहेत. त्यांच्या एका मुलीचं नाव गीती तर दुसऱ्या मुलीचं नाव संगीती असे आहे. रोहिताश आपल्या मुलींसोबतही अनेक धमाल व्हिडीओ शेअर करत असतात. रोहिताश यांच्या मुलीदेखील खूप गोड आहेत.


‘भाभाजी घर पर है’ या मालिकेत मनमोहन तिवारीची भूमिका साकारणाऱ्या रोहिताश यांनी मालिकांसोबतच चित्रपटातही काम केले आहे.

Web Title: 'Bhabhiji Ghar Par Hai' fame Manmohan Tiwari's real life wife is so beautiful