ऑनस्क्रीन भावासोबत चारू असोपानं केली होती एंगेजमेंट, दुसऱ्या लग्नाआधी या अभिनेत्यावर जडला होता जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 06:38 PM2022-06-30T18:38:05+5:302022-06-30T18:54:00+5:30

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन म्हणाला की त्याची पत्नी चारू असोपा आधीच विवाहित होती. पण तिने आपल्या लग्नाबद्दल कोणालाच सांगितले नाही.

Before marrying to rajeev sen charu asopa was engaged to tv actor neeraj malviya | ऑनस्क्रीन भावासोबत चारू असोपानं केली होती एंगेजमेंट, दुसऱ्या लग्नाआधी या अभिनेत्यावर जडला होता जीव

ऑनस्क्रीन भावासोबत चारू असोपानं केली होती एंगेजमेंट, दुसऱ्या लग्नाआधी या अभिनेत्यावर जडला होता जीव

googlenewsNext

Charu Asopa Rajeev Sen Divorce: बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन(Rajeev Sen) चा संसार आता मोडण्याच्या मार्गावर आहे.राजीव आणि चारू  (Charu Asopa)  एकमेकांवर अनेक प्रकारे आरोप करत आहेत. तुटलेल्या नात्यांदरम्यान राजीवने चारूबाबत असा खुलासा केला आहे, जो ऐकून सगळेच थक्क झाले आहेत.

चारूचे आधीच लग्न झाले होते
राजीव सेन म्हणाला की त्यांची पत्नी चारू असोपा आधीच विवाहित होती. पण तिने आपल्या लग्नाबद्दल कोणालाच सांगितले नाही. त्यामुळे चारूचे आधीच लग्न झाल्याचे समजताच तो चक्रावून गेला. राजीव म्हणाला- मी समजू शकतो की तिचा तो भूतकाळ होता, पण तिने मला सांगायला हवे होते आणि मी तिला सन्मानाने स्वीकारले असते.

ऑनस्क्रीन भावासोबत झाली होती एंगेजमेंट
या संदर्भात चारू म्हणते की राजीवला तिच्या पहिल्या लग्नाबद्दल आधीच माहिती होती आणि तो तिच्यावर खोटे आरोप करत आहे. चारू असोपाच्या पहिल्या लग्न कोणाशी झालं आणि केव्हा झालं हे फक्त चारू आणि राजीवच सांगू शकतात. चारू असोपा राजीव सेनसोबत रिलेशनशिपमध्ये येण्यापूर्वी टीव्ही अभिनेता नीरज मालवीयला डेट केले होते.

'मेरे अंगने में' या टीव्ही शोमध्ये एकत्र काम केले होते. या शोमध्ये चारू आणि नीरज  यांनी भाऊ आणि बहिणीची भूमिका साकारली होती. पण शोदरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. पडद्यावर भाऊ-बहिण बनून लोकांची मने जिंकणारे चारू आणि नीरज हे खऱ्या आयुष्यात लव्ह कपल बनले. शो दरम्यान, चारू आणि नीरज एकमेकांच्या प्रेमात  पडले होते. दोघांनी 2016 मध्ये एकमेकांशी लग्न केले. दोघेही याच वर्षी लग्न करणार होते. पण नशिबाने कदाचित काहीतरी वेगळंच केलं होतं आणि दोघांचं लग्नाआधी ब्रेकअप झालं.

नीरज मालवीयनंतर चारू असोपाच्या आयुष्यात राजीव सेनची एंट्री झाली. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यानंतर 2019 मध्ये दोघांनी ड्रिम वेडिंग केले. पण आता चारू असोपाचे राजीव सेनसोबतचे वैवाहिक आयुष्यता वादळ आलं आहे. चारूने राजीवकडून घटस्फोट मागितला आहे.

Web Title: Before marrying to rajeev sen charu asopa was engaged to tv actor neeraj malviya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.