मधुरा-विक्रमच्या अजब लग्नाची गजब कहाणी 'छत्रीवाली' मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 18:48 IST2019-02-05T18:48:17+5:302019-02-05T18:48:46+5:30

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'छत्रीवाली' मालिकेचे कथानक आता उत्कंठावर्धक वळणावर येऊन ठेपले आहे.

The beautiful story of Madhura-Vikram's wonderful movie 'Chatriwali' series | मधुरा-विक्रमच्या अजब लग्नाची गजब कहाणी 'छत्रीवाली' मालिकेत

मधुरा-विक्रमच्या अजब लग्नाची गजब कहाणी 'छत्रीवाली' मालिकेत

 स्टार प्रवाह वाहिनीवरील 'छत्रीवाली' मालिकेचे कथानक आता उत्कंठावर्धक वळणावर येऊन ठेपले आहे. नकार-होकाराचे नाट्य रंगल्यानंतर मधुरा-विक्रमचा साखरपुडा तर पार पडला. आता उत्सुकता आहे ती दोघांच्या लग्नाची.

 
विधीवत लग्न व्हावे ही मधुराच्या घरच्यांची इच्छा आहे तर विक्रमच्या घरच्यांनी मात्र डेस्टिनेशन वेडिंग, ग्रॅण्ड रिसेप्शन असे बरेच प्लॅन्स केलेत. त्यामुळे दोन्ही कुटुंबात पुन्हा एकदा तू तू मैं मैं रंगणार हे वेगळे सांगायला नको. घरच्यांची मने सांभाळत हे दोघे आपलं नाते कसे निभावणार? याची रंगतदार गोष्टी ‘छत्रीवाली’च्या महाएपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी पाहायला विसरु नका छत्रीवाली मालिकेचा महाएपिसोड रविवार १० जानेवारीला दुपारी १ आणि रात्री ८ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.
‘छत्रीवाली‘ या मालिकेत प्रेक्षकांना एका मुलीची कथा पाहायला मिळणार आहे. छत्रीवाली ही गोष्ट आहे आत्मविश्वासू, कष्टाळू आणि साधेपणात सौंदर्य शोधणाऱ्या मधुराची. तर तिकडे जबाबदारीचं भान नसलेला, लाडात वाढलेला मधुराच्या अगदी विरुद्ध स्वभावाचा आणि तिच्या साधेपणाची सतत टिंगल उडवणारा विक्रम आहे. या दोघांवर आधारीत मालिका आहे. ‘छत्रीवाली‘ या मालिकेत संकेत पाठक आणि नम्रता प्रधान ही नवी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. संकेत पाठकने या पूर्वी स्टार प्रवाहच्याच दुहेरी या लोकप्रिय मालिकेत दुष्यंत ही व्यक्तिरेखा साकारली होती तर नम्रताची ही पहिलीच मालिका आहे. 

Web Title: The beautiful story of Madhura-Vikram's wonderful movie 'Chatriwali' series