बनमस्का टायटस साँग प्रेक्षकांच्या पसंतीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2016 14:37 IST2016-08-07T09:07:56+5:302016-08-07T14:37:56+5:30

झी युवा या नव्या मराठी वाहिनीवर मैत्रेयी आणि सौमित्रची ट्विस्टेड प्रेमकथा सुरु होत आहे. ही प्रेमकथा प्रेक्षकांना २२ आॅगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण ही मालिका भेटीला येण्यापूर्वीच बनमस्का या मालिकेचे टायटल सॉंग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

Banmuska Titas likes the audience | बनमस्का टायटस साँग प्रेक्षकांच्या पसंतीस

बनमस्का टायटस साँग प्रेक्षकांच्या पसंतीस

युवा या नव्या मराठी वाहिनीवर मैत्रेयी आणि सौमित्रची ट्विस्टेड प्रेमकथा सुरु होत आहे. ही प्रेमकथा प्रेक्षकांना २२ आॅगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण ही मालिका भेटीला येण्यापूर्वीच बनमस्का या मालिकेचे टायटल सॉंग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मैत्रेयी आणि सौमित्रची प्रेमकथा असलेल्या 'बन मस्का' या मालिकेचे टायटल साँग  डिजीटल माध्यमातून सर्वत्र प्रदर्शित झाले आहे. या मालिकेला यू-ट्यूबवर 'बन मस्का'च्या गीताला एक लाखांहून जास्त प्रेक्षकांनी पाहिले आहे. हे गाणे जसराज जोशी आणि 'बन मस्का'या गाण्याद्वारे संगीत क्षेत्रात पदार्पण करणाºया सोनिया मुंढे यांनी गायले आहे. 

Web Title: Banmuska Titas likes the audience