‘बालिका वधु’नं गुपचूप उरकलं लग्न? अविका गौरचा फोटो पाहून सुरु झाली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2021 17:45 IST2021-03-28T17:44:24+5:302021-03-28T17:45:11+5:30

होय, अविकाने सोशल मीडियावर वधूच्या वेशातील फोटो शेअर केला आणि तिचा हा फोटो पाहून सगळ्याच चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

balika vadhu fame avika gor bride look viral on social media | ‘बालिका वधु’नं गुपचूप उरकलं लग्न? अविका गौरचा फोटो पाहून सुरु झाली चर्चा

‘बालिका वधु’नं गुपचूप उरकलं लग्न? अविका गौरचा फोटो पाहून सुरु झाली चर्चा

ठळक मुद्दे‘बालिका वधु’ मालिकेमुळे आजही अविका छोटी आनंदी म्हणूनच जास्त ओळखली जाते.

‘बालिका वधु’ या मालिकेत आनंदीची लीड भूमिका साकारणारी अभिनेत्री अविका गौर  प्रेमात पडलीय. होय, काही दिवसांपूर्वीच अविकाने सोशल मीडियावर खुल्लमखुल्ला प्रेमाची कबुली दिली होती.  स्वप्नातल्या राजकुमारासोबत हातात हात घालून फिरतानाचे गोव्याच्या समुद्रकिनाºयावरचे फोटो तिने शेअर केले होते. आता काय तर अविकाने गुपचूप लग्न केल्याची चर्चा रंगलीये. होय, अविकाने सोशल मीडियावर वधूच्या वेशातील फोटो शेअर केला आणि तिचा हा फोटो पाहून सगळ्याच चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. मग काय, अविकाने सीक्रेट लग्न केल्याची चर्चा सुरु झाली. 

 शेअर केलेल्या फोटोत अविका ख्रिश्चन वधू रुपात दिसत आहे. वराच्या हातात तिचा हात आहे. फायनली..., असे लिहित अविकाने फोटो शेअर केला. यानंतर अनेक चाहत्यांनी अविकाला लग्नाच्या शुभेच्छा द्यायला सुरुवात केली. तुम्हीही अविकाचे चाहते असाल आणि तिला शुभेच्छा देणार असाल तर जरा थांबा... कारण अविकाने लग्न वगैरे केलेले नसून हा फोटो तिच्या नव्या गाण्याची एक झलक आहे. फोटोतील तरूण अविकाचा बॉयफ्रेन्ड नसून साऊथ स्टार आदिल आहे. 

अविकाचा बॉयफ्रेंड मिलिंद चांदवानी याने कमेंट करत आपण या गाण्याची आतुरतेने वाट पाहत असल्याचे म्हटले आहे.  सध्या अविका टीव्ही शो ‘रोडिज’ फेम मिलिंद चंदवानीला डेट करतेय.

‘बालिका वधु’ मालिकेमुळे आजही अविका छोटी आनंदी म्हणूनच जास्त ओळखली जाते. या मालिकनंतर ती ससुराल सिमर का, झलक दिखलाजा,  फियर फॅक्टर- खतरों के खिलाड़ी  या रिअ‍ॅलिटी शोमध्येही सहभागी झाली होती.  
सध्या अविका साऊथ इंडस्ट्रीमध्येही पाय रोवण्याचे प्रयत्न करतेय. लवकरच ती प्रसिद्ध अभिनेता नागा शौर्यबरोबर अविका काम करणार असल्याची चर्चा आहे.. याशिवाय ‘बालिका वधू’ ही मालिका परत येणार असल्याचीदेखील चर्चा जोरात सुरू आहे. या मालिकेत अविका दिसणार, अशीही चर्चा आहे.  

Web Title: balika vadhu fame avika gor bride look viral on social media