'सुख म्हणजे नक्की काय असतं'मध्ये बहरतंय गौरी-जयदीपचं नातं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 11:27 IST2021-02-04T11:27:03+5:302021-02-04T11:27:33+5:30

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत सध्या आनंदाचे वातावरण आहे.

Baharatanya Gauri-Jaideep's relationship in 'What exactly is happiness' | 'सुख म्हणजे नक्की काय असतं'मध्ये बहरतंय गौरी-जयदीपचं नातं

'सुख म्हणजे नक्की काय असतं'मध्ये बहरतंय गौरी-जयदीपचं नातं

स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत सध्या आनंदाचे वातावरण आहे. माईंनी गौरीचा सून म्हणून स्वीकार करुन तिला शिर्केपाटलांच्या सुनेचे सर्व अधिकार दिले आहेत. त्यामुळे शिर्केपाटील कुटुंबावरचे तिरस्काराचे सावट दूर झाले आहे. एकीकडे माईंनी गौरीला सून म्हणून स्वीकारले आहे तर दुसरीकडे जयदीप आणि गौरीचे नातेही बहरू लागले आहे. लवकरच जयदीप गौरीला कार चालवायला देखील शिकवणार आहे.

मालिकेतल्या या नव्या वळणाविषयी सांगताना गौरीची भूमिका साकारणारी गिरीजा प्रभू म्हणाली, ‘जयदीप-गौरी या जोडीला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत आहे. जयदीप-गौरीचं नातंही दिवसेंदिवस बरहतंय. लवकरच मालिकेत एक छान ट्रॅक पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये जयदीप गौरीला कार चालवायला शिकवतो. खरं सांगायचं तर मला ड्रायव्हिंग अजिबाज जमत नाही. हा सीन करताना मला जयदीप म्हणजेज मंदार जाधवने कार शिकवली. सुरुवातीला खूपच भीती वाटत होती. मात्र मंदारचं मार्गदर्शन आणि संपूर्ण टीमच्या पाठिंब्यामुळे मी हा सीन करु शकले.’


स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेने अल्पावधीतच रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. या मालिकेतील जयदीप आणि गौरीची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावतेय. सध्या मालिकेत रंजक वळण आले आहे. ते म्हणजे जयदीप आणि गौरीच्या लग्नामुळे नाराज झालेल्या माईंचीही आता गौरीवरील नाराजी दूर झाली आहे. त्यामुळे एकीकडे पुन्हा एकदा शिर्के पाटील कुटुंबात सुख नांदताना दिसतंय तर दुसरीकडे जयदीप आणि गौरीमध्येही हळूहळू प्रेम फुलताना दिसते आहे.
गौरी आणि जयदीपच्या नात्यातले हे नवे क्षण अनुभवण्यासाठी पाहायला विसरु नका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

 

Web Title: Baharatanya Gauri-Jaideep's relationship in 'What exactly is happiness'