अयान रहमानीची होणार चंद्र नंदिनी या मालिकेत एंट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2017 17:59 IST2017-07-26T12:29:08+5:302017-07-26T17:59:08+5:30
अयान रहमानीने पेशवा बाजीराव या मालिकेत चिमाजी अप्पा यांच्या लहानपणीची भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती ...

अयान रहमानीची होणार चंद्र नंदिनी या मालिकेत एंट्री
अ ान रहमानीने पेशवा बाजीराव या मालिकेत चिमाजी अप्पा यांच्या लहानपणीची भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. पण आता या मालिकेने लीप घेतल्यामुळे अयानने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. आता अयानच्या फॅन्ससाठी एक चांगली बातमी आहे. तो लवकरच एका मालिकेत झळकणार असून एका मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
अयान रहमानी चंद्र नंदिनी या मालिकेत झळकणार असल्याचे कळतेय. ही मालिका लवकरच लीप घेणार असून या मालिकेत अनेक नवीन कलाकार पाहायला मिळणार आहेत. छोट्या पडद्यावरचे अनेक प्रसिद्ध कलाकार या मालिकेत आता पाहायला मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. मालिकेने लीप घेतल्यानंतर चंद्रचा मुलगा मालिकेत दाखवला जाणार आहे. बिंदूसारा असे चंद्रच्या मुलाचे नाव असून ही व्यक्तिरेखा अयान साकारणार असल्याचे म्हटले जात आहे. अयानचा या मालिकेतील लूक खूप वेगळा असणार आहे. या लूकमध्ये प्रेक्षकांना अयान आवडेल अशी या मालिकेच्या टीमला खात्री आहे.
अयानच्या अभिनय कौशल्याचे नेहमीच कौतुक केले जाते. तो वयाने खूपच लहान असला तरी तो खूप चांगला कलाकार आहे.
त्याने जोधा अकबर, मेरी आवाज ही पहचान है, चक्रवर्ती अशोक सम्राट यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. फुलवा या मालिकेद्वारे त्याने त्याच्या कारर्किदीला सुरुवात केली होती. त्याचा भाऊ जन्नत झुबीर रहमानीदेखील प्रसिद्ध बालकलाकार आहे. त्याने महाराणा प्रताप या मालिकेत फूल कन्वर ही भूमिका साकारली आहे.
अयान त्याच्या या नव्या भूमिकेसाठी खूप उत्सुक असल्याचे कळतेय.
Also Read : OMG : ‘चंद्र नंदिनी’ची ही अॅक्ट्रेस रियल लाइफमध्ये आहे बिकिनी क्वीन !