अविका गौरचा झक्कास ट्रान्सफॉर्मेशन, नवीन अंदाज तुम्हाला करेल घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2020 18:48 IST2020-10-29T18:45:37+5:302020-10-29T18:48:41+5:30

सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते. विविध अंदाजातील तिचे फोटो पाहायला मिळतात. 

Avika Gor transformation will make you crazy | अविका गौरचा झक्कास ट्रान्सफॉर्मेशन, नवीन अंदाज तुम्हाला करेल घायाळ

अविका गौरचा झक्कास ट्रान्सफॉर्मेशन, नवीन अंदाज तुम्हाला करेल घायाळ

कलाकार मंडळी मालिका आणि सिनेमात अभिनय करण्याबरोबरच इतर गोष्टींमध्येही विशेष लक्ष देऊ लागले आहेत. छोट्या पडद्यावरील 'बालिका वधू'मधून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री अविका गौर  ख-या आयुष्यात खूपच स्टायलिश आहे. अविका ब-याच दिवसांपासून तिच्या वाढत्या वजनामुळे खूप अस्वस्थ होती. स्वतः सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून तिने ही गोष्ट चाहत्यांसह शेअर केली होती. आता पुन्हा एकदा अविका गौर चर्चेत आली आहे.  

 
अविका गौरने तिच्या साडीतील काही फोटो सोशल मीडियावर इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहेत, तिने सोशल मीडियावर शेअर केलेला फोटो तुम्हालाही क्लीन बोल्ड करेल. या फोटोमध्ये अविकाचा झालेला मेकओव्हर तुम्हाला आकर्षित करेल. तिच्या नव्या लूकवर चर्चा होत आहे. या प्रत्येक फोटोमधील अविकाची दिलखेचक अदा कुणालाही घायाळ करेल अशीच आहे. 

या सगळ्या फोटोंमध्ये अविकाचं सौंदर्य आणखीनच खुलून गेल्याचं पाहायला मिळत आहे.असे एक नाही तर बरेच फोटो इन्स्टाग्रामवर अविकाने शेअर केलेत. तिचा हा अंदाज रसिकांनाही तितकाच भावतो आहे. विशेष म्हणजे अविकाच्या टोंड फिगरने सा-यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते. विविध अंदाजातील तिचे फोटो पाहायला मिळतात. 

कजाकिस्तानात अविका खूप लोकप्रिय आहे. `बालिकावधू` या कार्यक्रमाच्या भागांचं प्रसारण सुरू आहे. अविकाची वाढती लोकप्रियता पाहून तिथल्या स्थानिक ब्रॉडकास्टर्स अविकाच्या `ससुराल सिमर का` या दुसऱ्या डेली सोपचे अधिकार विकत घेतले आहेत. यामध्ये अविकानं रोलीची भूमिका निभावलीय.


आपल्या कजाकिस्तान ट्रीपबद्दल अविका म्हणजे, आनंदीनं प्रेक्षकांच्या मनात किती खोलवर स्थान प्राप्त केलंय, हे मला तिथं जाऊन समजलं. तिथं लोकांना भेटून मला खूप चांगलं वाटलं असेही तिने म्हटले होते. 

Web Title: Avika Gor transformation will make you crazy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.