कॉमेडीची GST एक्सप्रेस मध्ये अवधूत गुप्ते म्हणतोय “मुंबई आमचा तुझ्यावर भरोसा हाय”
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2017 17:27 IST2017-08-03T11:57:51+5:302017-08-03T17:27:51+5:30
कलर्स मराठीवर नुकत्याच सुरू झालेल्या कॉमेडीची GST एक्सप्रेस या कार्यक्रमामध्ये अवधूत गुप्ते प्रथम प्रेक्षकाच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. ...
(1).jpg)
कॉमेडीची GST एक्सप्रेस मध्ये अवधूत गुप्ते म्हणतोय “मुंबई आमचा तुझ्यावर भरोसा हाय”
क र्स मराठीवर नुकत्याच सुरू झालेल्या कॉमेडीची GST एक्सप्रेस या कार्यक्रमामध्ये अवधूत गुप्ते प्रथम प्रेक्षकाच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या कार्यक्रमाची संकल्पना खूप वेगळी असून हा कार्यक्रम प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी या कार्यक्रमाच्या टीमला खात्री आहे. प्रियदर्शन जाधव या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. या कार्यक्रमात नुकताच सोनू फिव्हर पाहायला मिळाला.
सोनू तुझा माझ्यावर भरवसा नाय काय या गाण्याचे विविध भाषांमधील व्हर्जन सध्या एेकायला मिळत आहे. या गाण्याने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. याच गाण्याचे आणखी एक व्हर्जन प्रेक्षकांना कॉमेडीची GST एक्सप्रेस मध्ये ऐकायला मिळणार आहे. अवधूत गुप्ते हे गाणे कार्यक्रमात सादर करणार आहे. “मुंबई आमचा तुझ्यावर भरोसा हाय, मुंबईची लोकं कशी शूर शूर, प्रोब्लेमला करतात दूर दूर... असे या गाण्याचे बोल आहेत. मुंबईतील लोक आणि या शहराविषयी हे गाणे आहे. मुंबईतील लोक प्रत्येक संकटाचा सामना कसा करतात हे या गाण्याद्वारे मांडण्यात आले आहे. या गाण्यातून अवधूत गुप्ते यांचे मुंबई विषयीचे प्रेम व्यक्त होत आहे.
दर्जेदार आणि निखळ विनोदाची मेजवानी देण्याचा हेतू लक्षात घेऊनच हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस आणण्यात आला आहे. ‘कॉमेडीची GST एक्सप्रेस’ या कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांना आशिष पवार, कमलाकर सातपुते, किशोर चौघुले, अदिती सारंगधर आणि प्राजक्ता हनमघर हे त्यांचे लाडके विनोदवीर पाहायला मिळत आहेत. हे विनोदवीर प्रेक्षकांचे चांगलंच मनोरंजन करतील यात काही शंकाच नाही.
Also Read : ‘संगीत म्हणजे माझ्यासाठी जीवन’ - अवधूत गुप्ते