"वयाच्या २७ व्या वर्षी डॉक्टर म्हणाले की मला कधीच मूल होणार नाही", जुई गडकरीने केलेला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 17:23 IST2025-07-12T17:23:15+5:302025-07-12T17:23:41+5:30

Jui Gadkari: सिनेइंडस्ट्रीत काम करत असताना जुईला गंभीर आजाराचा सामना करावा लागला होता. 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत जुईने या कठीण काळाबद्दल भाष्य केले होते.

"At the age of 27, doctors told me I would never have children", reveals Jui Gadkari | "वयाच्या २७ व्या वर्षी डॉक्टर म्हणाले की मला कधीच मूल होणार नाही", जुई गडकरीने केलेला खुलासा

"वयाच्या २७ व्या वर्षी डॉक्टर म्हणाले की मला कधीच मूल होणार नाही", जुई गडकरीने केलेला खुलासा

जुई गडकरी (Jui Gadkari) टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सध्या ती 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) या मालिकेत काम करताना दिसते आहे. तिने या मालिकेत साकारलेली सायली प्रेक्षकांना खूप भावते आहे. सिनेइंडस्ट्रीत काम करत असताना जुईला गंभीर आजाराचा सामना करावा लागला होता. 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत जुईने या कठीण काळाबद्दल भाष्य केले होते. 

जुई गडकरी म्हणाली की, ''वयाच्या २७व्या वर्षी तुम्हाला तुमची स्त्रीरोग विशेषज्ज्ञ सांगते की तुला मुल होऊ शकणार नाही. तर मला तेव्हा असं झालं होतं की म्हणजे आपण सिकिंगच होत नाही आधी या सगळ्या गोष्टींना पण त्यानंतर पण मी स्वतःला वेळ दिला आणि मी एका पॉइंटला ठरवलं स्वतःशी. कारण आपण रोज नाही रडत बसू शकत या गोष्टीवरून आणि आपण जर रडत बसलो तर आपली बॉडी आहे ना अजून नकारात्मक रिस्पॉन्स द्यायला लागते मग ती अजून त्रास स्वतःला करून घेते. आपली बॉडी त्यानंतर म्हणजे कुठेतरी जाऊन पॉझिटिव्ह होणार असतील गोष्टी तर त्याही होत नाहीत. त्यामुळे मी रड रड रडले किंवा जो काही त्रास सहन करायचा होता तो करून घेतला आणि एका पॉइंटला मी ठरवलं की बस आज रडली आहे. ह्याच्यानंतर मी ह्या गोष्टीसाठी नाही रडणार आणि त्यानंतर वर्ष निघत गेली म्हणजे चालली होती. चालली होती वयाचा इश्शू तर असतोच कारण मुलीचं कसं असतं की एवढ्या वयामध्ये लग्न झालं पाहिजे हा एवढ्या वयामध्ये मुलबाळ झालं पाहिजे या सगळ्या गोष्टी तुमच्याही डोक्यात म्हणजे माझ्याही डोक्यात येतंचं होत्या. मी पण म्हणजे साधारण मुलगी आहे. माझंही प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं. तसं माझंही स्वप्न होतंच की वेळेत लग्न व्हावं मुलं बाळं आपला संसार ह्या सगळ्या नॉर्मल इच्छा आहेत. माझ्याही पण त्या नाही होऊ शकल्या. त्या वेळेमध्ये त्याचा माझ्या आई-वडिलांना देखील खूप त्रास झाला. आजही होतो कारण आता तर त्या गोष्टीला दहा वर्ष होऊन गेली आहेत आणि माझं म्हणजे ते आपल्याकडे एक म्हणतो ना की अजून लग्न नाही झालं अजून लग्न नाही झालं तर मी या गोष्टीला मी दररोज सामोरी जाते. हा प्रश्न की लग्न नाही झाले. बापरे पुढे कशा काय होतील गोष्टी तर माझं एका पॉइंटला असं झालं ना की ठीक आहे उशीर झालाय. मान्य आहे मला याच्यापुढे माझं लग्न होऊन माझी मुलं बाळं कधी हे सगळे प्रश्न माझ्याही डोक्यात रोज येत असतात पण त्याचबरोबर ना मग मी पॉझिटिव्ह गोष्टी कुठल्या आहेत माझ्या आयुष्यातल्या त्या बघायला सुरुवात करते.''


ती पुढे म्हणाली की, ''माझा देवावर पूर्ण विश्वास आहे ज्या काही गोष्टी आजपर्यंत घडल्यात त्या त्याच्या मर्जीनुसार घडल्यात. त्यामुळे लग्न आणि माझं सगळं पुढचं हे ही त्याच्या मर्जीनुसार घडणार आहे आणि जेव्हा ते त्याच्या मर्जीने घडतं तेव्हा ते द बेस्ट असतं. त्यामुळे तुमच्या पण आयुष्यात जर का अशा काही गोष्टी असतील काही अडथळा येत असतील तर ठीक आहे. स्वीकारा कारण तुमच्या आयुष्यातल्या पॉझिटिव्ह गोष्टी पण तेवढ्याच असतील तर त्या पॉझिटिव्ह गोष्टींकडे लक्ष द्या आणि हळूहळू गोष्टींची निवड करा नुसतं प्रेशर घेऊ नका. त्या गोष्टींचं की अरे बापरे कधी होणार कसं होणार काय होणार त्यामुळे दबाव घेऊ नका आणि एक वेगळा विचार बघता आत्ताच प्रॅक्टिकली जग इतकं म्हणजे आपण बघतो ना इतकं स्पीडी झालेलं आहे आपल्याला काम करायची असतात. आपलं ट्रॅव्हेलिंगमध्ये वेळ जातो या सगळ्या गोष्टी बघताना या सगळ्या गोष्टी खूप मनापासून आणि सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली प्लान करायला हव्यात. हल्ली कारण मूलबाळ होणं किंवा संसार नोकरी ह्या सगळ्या गोष्टी सांभाळणं ही सोपी गोष्ट नाहीये. माझ्या आईने त्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी केल्या. पण आत्ता तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कितपत व्यवस्थित जमणार आहेत. याचा आधी व्यवस्थित प्लानिंग करा आणि त्यानंतरच पुढच्या सगळ्या गोष्टींकडे जा कारण असं ना कोणाच्याच बाबतीत व्हायला नको की मुलाकडे लक्ष देता येत नाहीये. नोकरी नीट होत नाहीये घर सांभाळणं होत नाहीये किंवा सगळ्या गोष्टी आणि मी या सगळ्या गोष्टी म्हणते कारण आपण आधीच ऑलराउंडर असतो. आपल्याला गरज नसते कसली कोणाची कोणाच्या सपोर्टची आपण ऑलराउंडर असतो तर सगळ्या गोष्टी छान करता याव्यात यासाठी आधीच व्यवस्थित शांतपणे प्लान करा स्वतःला वेळ द्या.''

Web Title: "At the age of 27, doctors told me I would never have children", reveals Jui Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.