नवरात्रीनिमित्त अश्विनी महांगडेनं केला अभिनेत्री रंजना यांचा लूक, होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 16:43 IST2025-09-26T16:42:40+5:302025-09-26T16:43:10+5:30
अभिनेत्री अश्विनी महांगडेने (Ashwini Mahangade) हिने यंदाच्या नवरात्रीत दिवंगत अभिनेत्री रंजना यांना खास मानवंदना दिली आहे. रंजना यांच्या गाजलेल्या चित्रपटांमधील एका लोकप्रिय लूकचा आधार घेत अश्विनीने केलेले हे विशेष फोटोशूट पाहून चाहते थक्क झाले आहेत.

नवरात्रीनिमित्त अश्विनी महांगडेनं केला अभिनेत्री रंजना यांचा लूक, होतोय व्हायरल
दरवर्षीप्रमाणेच यंदाही अभिनेत्री अश्विनी महांगडे (Ashwini Mahangade) हिने नवरात्रीनिमित्त हटके फोटोशूट करत चाहत्यांची मनं जिंकली आहेत. यावर्षी तिने मराठी चित्रपटसृष्टीतील दिवंगत आणि दिग्गज अभिनेत्रींना मानवंदना देण्याचा संकल्प केला आहे. आता तिने दिवंगत अभिनेत्री रंजना यांचा आयकॉनिक लूक साकारला आहे. मराठमोळ्या साडीतील आणि खास हेअरस्टाईलसह केलेला रंजना यांचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूपच आवडला असून, सोशल मीडियावर तो तुफान व्हायरल होत आहे.
अभिनेत्री अश्विनी महांगडेने हिने यंदाच्या नवरात्रीत दिवंगत अभिनेत्री रंजना यांना खास मानवंदना दिली आहे. रंजना यांच्या गाजलेल्या चित्रपटांमधील एका लोकप्रिय लूकचा आधार घेत अश्विनीने केलेले हे विशेष फोटोशूट पाहून चाहते थक्क झाले आहेत. रंजना यांचा क्लासिक आणि मोहक अंदाज अश्विनीने इतक्या अप्रतिमरित्या साकारला आहे की, सध्या तिचा हा लूक सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत आहे.
अश्विनीने रंजना यांच्या लूकमधील फोटो शेअर केले आणि लिहिले की, आजचा रंग - हिरवा. देवी - देवी स्कंदमाता. रंजना देशमुख: कलाकार. रंजना देशमुख या मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि गाजलेल्या अभिनेत्री होत्या. त्यांचा जन्म १९५५ मध्ये झाला. १९७० ते १९८० या काळात त्यांनी मुंबईचा फौजदार, चानी , अरे संसार संसार, झुंज, जखमी वाघीण यांसारख्या अनेक चित्रपटांमधून प्रभावी भूमिका केल्या. एका अपघातामुळे त्यांचे अभिनयक्षेत्र थांबले, तरीही प्रेक्षकांच्या मनात त्यांचे विशेष स्थान अजूनही आहे. २००० साली त्यांचे निधन झाले. अश्विनीच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.