'कारण गुन्ह्याला माफी नाही'; अश्विनी कासारचं छोट्या पडद्यावर पुनरागमन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 02:36 PM2023-04-27T14:36:35+5:302023-04-27T14:37:11+5:30

Ashwini Kasar: अभिनेत्री अश्विनी कासार या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. या मालिकेत ती ACP अनुजा हवालदार ही भूमिका साकारणार आहे.

Ashwini Kasar's return to the small screen karan gunhyala affi nahe | 'कारण गुन्ह्याला माफी नाही'; अश्विनी कासारचं छोट्या पडद्यावर पुनरागमन

'कारण गुन्ह्याला माफी नाही'; अश्विनी कासारचं छोट्या पडद्यावर पुनरागमन

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील सोनी मराठी या वाहिनीवर कायम आशयघन मालिकांचं प्रसारण होत असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे दर्जेदार मालिकांसाठी या वाहिनीकडे पाहिलं जातं. यामध्येच आता लवकर ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ ही नवी थरारक मालिका  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो समोर आला असून हा प्रोमो व्हायरल होत आहे. 

 'तुमची मुलगी काय करते' या गाजलेल्या थरारक मालिकेची टीम ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ या मालिकेत पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. या मालिकेत इन्स्पेक्टर भोसले आणि जमदाडे एका नव्या अंदाजात प्रेक्षकांसमोर येणार आहेत. तर, अभिनेत्री अश्विनी कासार या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. या मालिकेत ती ACP अनुजा हवालदार ही भूमिका साकारणार आहे. तिच्यासोबत अभिनेत्री रुपल नंददेखील या मालिकेत दिसणार आहे. मोहिनी दुभाषी असे तिच्या व्यक्तिरेखेचे नाव आहे. 

 सध्याचे तरुण एका वेगळ्याच जाळ्यात अडकले आहेत.  ते जाळं आहे ऑनलाईन गेमिंगचं. नकळत या जाळ्यात सगळे गुंतले जात आहेत. झटपट पैसे जिंकण्याच्या आशेने या ऑनलाईन गेमिंगच्या जाळ्यात सगळे अडकत आहेत. त्यातून होणार्‍या नुकसानाची भरपाई करण्यासाठी त्यांना आणखीन मोठ्या गुन्ह्यांच्या आहारी जावं लागतं आहे. यातून चोरी, सिरियल किलिंग या गुन्ह्याचे प्रमाणही वाढतं आहे. त्यासाठीच महाराष्ट्र पोलीस दलात 'स्पेशल ऑपरेशन स्क्वॉड' नेमण्यात आलं आहे. त्याचा भाग इन्स्पेक्टर भोसले, जमदाडे आणि ACP अनुजा असणार आहेत. ते कशा प्रकारे या गुन्ह्याला आवरण्याचा आणि गुन्हेगारांना शिक्षा करण्याचा प्रयत्न करतील, हे आपल्याला पाहायला मिळेल.      

निरनिराळ्या चित्रपटांमधून आणि मालिकांमधून वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारे हरीश दुधाडे  प्रेक्षकांच्या लाडक्या, इन्स्पेक्टर भोसले या व्यक्तिरेखेत  पुन्हा दिसणार आहेत. चंद्रलेखा जोशी हिने आपल्या अभिनायाच्या जोरावर जमदाडे ही व्यक्तिरेखा घराघरांत पोहोचवली. त्याबरोबरच पोलिसांच्या आयुष्यातील दुसरी बाजूही  आपल्याला या मालिकेतून पाहता येणार आहे. पोलीस आपल्या कामात नेहमी तत्पर असतात. दिवस-रात्र आपल्या कामाला महत्त्व देतात. आपल्या कुटुंबाला देण्यासाठी पुरेसा वेळ त्यांच्याकडे नसतो. ते आपल्या कामाला नेहमी प्राधान्य देतात. 'कारण गुन्ह्याला माफी नाही' मालिकेतून नेहमी आपल्या कामात तत्पर असलेल्या पोलिसांच्या वैयक्तिक आयुष्यात येणाऱ्या अडचणींवरही  भाष्य केले जाणार आहे. 
लेखक चिन्मय मांडलेकर, दिग्दर्शक भीमराव मुडे आणि निर्माती मनवा नाईक यांचादेखील सोनी मराठी वाहिनीसाठी, मालिकेसाठी चांगलाच हातभार लागला आहे. 
 

Web Title: Ashwini Kasar's return to the small screen karan gunhyala affi nahe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.