..म्हणून मी कधीही बोल्ड फोटोशूट करणार नाही; अश्विनीने घेतलाय मोठा निर्णय, कारण माहितीये?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 17:58 IST2024-03-08T17:55:55+5:302024-03-08T17:58:33+5:30

अश्विनीने महांगडेने लोकमत फिल्मीशी बोलताना तिने घेतलेल्या मोठ्या निर्णयाविषयी खुलासा केला

ashvini mahangade decide not to play bold characters in serials after swarajya rakshak sambhaji | ..म्हणून मी कधीही बोल्ड फोटोशूट करणार नाही; अश्विनीने घेतलाय मोठा निर्णय, कारण माहितीये?

..म्हणून मी कधीही बोल्ड फोटोशूट करणार नाही; अश्विनीने घेतलाय मोठा निर्णय, कारण माहितीये?

'आई कुठे काय करते' फेम अश्विनी महांगडे ही मराठी मनोरंजन विश्वातील चर्चेतील अभिनेत्री. अश्विनीने 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत साकारलेली राणू आक्कांची भूमिका चांगलीच गाजली. अश्विनीने शिवरायांची लेक आणि शंभूराजांची बहिण राणूआक्कांची साकारलेली भूमिका लोकप्रिय झाली. अश्विनी सध्या 'आई कुठे काय करते' मालिकेत अनघाची भूमिका साकारत आहे. अश्विनीने तिच्या आयुष्यात बोल्ड भूमिका न करण्याचा निर्णय घेतला. त्यामागचं कारण तिने लोकमत फिल्मीशी बोलताना सांगितलंय.

अश्विनीने महिला दिनानिमित्त लोकमत फिल्मीशी संवाद साधला. तेव्हा ती म्हणाली.."राणूआक्कांची भूमिका साकारल्यावर मी काहीसं वेगळं फोटोशूट केलं. ऐतिहासीक भूमिका साकारल्यावर मला जरा नॉर्मल राहायचं होतं. म्हणजे वेगळी भूमिका मिळेल. पण ते फोटोशूट केल्यावर लोकांच्या कमेंट्स होत्या की.. ताईसाहेब आम्हाला आमच्या राणूआक्कांना असं बघायला नाही आवडणार. तुम्हाला खुप कामं मिळतील."

अश्विनी पुढे म्हणाली, "मला कमेंट्स करणारी मंडळी कधीच एकेरी बोलत नाहीत. ते कायम ताईच म्हणतात. त्यामुळे मी खुप विचार केला यावर. आणि सुवर्णमध्य साधला की, मला नाही बोल्ड लूकवर काम करायचंय. कारण तशा भूमिका करण्यात मी कंफरटेबल नाहीय." त्यामुळे नंतर अश्विनीने कधीही तसं वेगळं फोटोशूट केलं नाही. अश्विनी अभिनेत्री आहेच शिवाय तिला राजकारणातही रस असल्याचं दिसतं.

 

Web Title: ashvini mahangade decide not to play bold characters in serials after swarajya rakshak sambhaji