​अश्मित पटेल अडकणार या अभिनेत्रीसोबत लग्नबंधनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 15:06 IST2018-01-18T09:36:02+5:302018-01-18T15:06:02+5:30

अश्मित पटेलला बिग बॉस या कार्यक्रमामुळे चांगलीच प्रसिद्धी मिळाली. या कार्यक्रमाच्या चौथ्या सिझनमध्ये तो झळकला होता तर महक चहलने ...

Ashmit Patel gets married to actress | ​अश्मित पटेल अडकणार या अभिनेत्रीसोबत लग्नबंधनात

​अश्मित पटेल अडकणार या अभिनेत्रीसोबत लग्नबंधनात

्मित पटेलला बिग बॉस या कार्यक्रमामुळे चांगलीच प्रसिद्धी मिळाली. या कार्यक्रमाच्या चौथ्या सिझनमध्ये तो झळकला होता तर महक चहलने या कार्यक्रमाच्या पाचव्या सिझनमध्ये हजेरी लावली होती. तसेच महक चहलने वाँटेड या चित्रपटात सलमानसोबत काम केले होते. ते दोघे लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा आहे. अश्मित बिग बॉसच्या घरात असताना वीणा मलिक आणि त्याच्या प्रेमकथेची चांगलीच चर्चा झाली होती. पण अश्मित वीणावर नव्हे तर महकवर प्रेम करत असल्याचे त्याने अनेकवेळा कबूल केले आहे. या दोघांच्या प्रेमकथेविषयी अश्मित सांगतो, आम्ही गेल्या १२ वर्षांपासून एकमेकांना ओळखत आहोत. अनेक पार्टींमध्ये आम्ही अनेकवेळा भेटलो आहोत. आम्ही वांद्रेला एकाच जिममध्ये अनेक वर्षं जात आहोत. पण आमच्यात अनेक वर्षं केवळ फ्रेंडशिप होती. पण एका दिवशी खूप पाऊस पडत होता. जिममध्ये येताना महकने तिची कार आणली नव्हती. त्यामुळे मी तिला घरी सोडण्याची ऑफर केली. त्यानंतर आम्ही कार्टर रोडवर भुट्टा खायला थांबलो. तिथे बसून आम्ही अनेक तास गप्पा मारल्या. त्याचवेळी आमच्यात मैत्री पेक्षा अधिक काहीतरी असल्याची आम्हाला जाणीव झाली. 
अश्मित आणि महक सध्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहे. महक आणि तो सध्या वांद्र्यात राहात आहेत. अश्मितने गेल्या वर्षीच्या ऑगस्टमध्ये महेकला लग्नासाठी प्रपोज केले होते. अश्मितने महेकला खूपच छानप्रकारे प्रपोज केले होते. याविषयी महेक सांगते, एकदा अश्मित आणि मी कॅफेमध्ये गेले होते. मी वॉशरूममध्ये गेल्यावर अश्मितने गोड पदार्थाची ऑर्डर दिली आणि त्याचसोबत त्या प्लेटमध्ये अंगठी ठेवायला देखील सांगितली. मी ही प्लेट बघितल्यावर अश्मित गुडघ्यांवर बसला आणि त्याने मला प्रपोज केले. 
अश्मित आणि महक यांनी दोघांनी नुकताच साखरपुडा केला असून ते दोघे ऑगस्ट किंवा सप्टेंबरच्या सुमारास युरोपमध्ये लग्न करणार असल्याची चर्चा आहे. तसेच लग्नानंतर ते दोघे आपल्या बॉलिवूडमधील मित्रमैत्रिणींसाठी मुबंईत रिसेप्शन देणार आहेत. 

Also Read : सलमान खानच्या ‘या’ अभिनेत्रीचा व्हिडीओ झाला लीक, इंटरनेटवर व्हायरल!

Web Title: Ashmit Patel gets married to actress