‘दिल है हिंदुस्तानी-2’च्या मंचावर जन्माष्टमीचा उत्सव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 10:52 IST2018-08-29T10:27:28+5:302018-08-29T10:52:37+5:30

कृष्ण जन्माष्टमीचा उत्सक ‘स्टार प्लस’वरील ‘दिल है हिंदुस्तानी-2’च्या मंचावर साजरा करण्यात आला.  या जन्माष्टमीच्या विशेष भागात ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि गायक बेनी दयाल सहभागी झाले होते.

Asha Bhosale celebrates Janmashtami's celebration on the stage of 'Dil Hai Hindustani-2' | ‘दिल है हिंदुस्तानी-2’च्या मंचावर जन्माष्टमीचा उत्सव

‘दिल है हिंदुस्तानी-2’च्या मंचावर जन्माष्टमीचा उत्सव

ठळक मुद्देआशाताईंनी स्पर्धकांना महत्त्वाचा सल्ला दिला

कृष्ण जन्माष्टमीचा उत्सक ‘स्टार प्लस’वरील ‘दिल है हिंदुस्तानी-2’च्या मंचावर साजरा करण्यात आला.  या जन्माष्टमीच्या विशेष भागात ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि गायक बेनी दयाल सहभागी झाले होते. यावेळी या दोघांनी बॉलिवूडमधील जन्माष्टमीशीची अनेक गाणी कार्यक्रमाचे परीक्षक तसेच स्पर्धकांबरोबर गायली. आशाताईंनी आपले अनेक अनुभव आणि गायनाविषयीच्या महत्त्वाच्या टिप्स यावेळी स्पर्धकांना दिल्या. 

भारतीय संगीत क्षेत्रात गेली सहा दशके आपला स्वतंत्र ठसा कयम राखलेल्या आशाताई म्हणाल्या, “भारतीय संगीतात रुची दाखविणाऱ्या अशा दर्जेदार आणि गुणी स्पर्धकांबरोबर सहभागी होताना मला खूपच आनंद वाटतो आहे. भारतीय संगीत हे अतिशय व्यापक असून ‘दिल है हिंदुस्तानी-2’मधले सर्व गायक हा वारसा जोपासता येते. या कार्यक्रमात भारतीय संगीताचा सन्मान केला जात असून त्यात या संगीतावर प्रेम करणारे जगभरातील स्पर्धक सहभागी होताना दिसतात. अशा लोकांबरोबर जन्माष्टमीचा कार्यक्रम साजरा करताना मला खूपच आनंद वाटला. अशा गुणी स्पर्धकांना काही सल्ला देता आला, याबद्दल मी स्वत:ला सुदैवी समजते आणि त्यांच्या गाण्यांनी मला पूर्वीच्या काळात नेलं.”


‘दिल है हिंदुस्तानी-2’ हा भारतीय संगीताच्या प्रेमामुळे देशांच्या सरहद्दी पुसून टाकणारा आणि हिंदुस्तानी संगीतावर प्रेम करणाऱ्या जगभरातील संगीतप्रेमींना एकत्र आणणारा रिअ‍ॅलिटी कार्यक्रम आहे. भारतीय संगीताचा प्रभाव अधोरेखित करणारा आणि जगभरातील स्पर्धकांकडून लोकप्रिय भारतीय संगीताला नवा आयाम देणाऱ्या या कार्यक्रमात जगभरातील हिंदुस्तानींचं एक संमेलनच भरलेलं असतं. या कार्यक्रमात जगभरातील गुणी गायक आणि संगीतकार
लोकप्रिय भारतीय गाणी गातील. पण ती गाणी ते स्वत:च्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत गातात.

Web Title: Asha Bhosale celebrates Janmashtami's celebration on the stage of 'Dil Hai Hindustani-2'