आई कुठे काय करते: अरुंधतीला होणार आशुतोषवर असलेल्या प्रेमाची जाणीव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 12:30 PM2022-05-10T12:30:58+5:302022-05-10T12:31:44+5:30

Aai kuthe kay karte:काही दिवसांपूर्वीच आशुतोष उघडपणे अरुंधतीसमोर त्याच्या प्रेमाची कबुली देतो. परंतु, आता अरुंधतीलाही आशुतोषवर असलेल्या प्रेमाची जाणीव होणार आहे. 

Arundhati will realize the love she has for Ashutosh | आई कुठे काय करते: अरुंधतीला होणार आशुतोषवर असलेल्या प्रेमाची जाणीव

आई कुठे काय करते: अरुंधतीला होणार आशुतोषवर असलेल्या प्रेमाची जाणीव

googlenewsNext

 स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेत सध्या एक वेगळाच ट्रॅक सुरु आहे. कुटुंबापासून दूर गेलेली अरुंधती एक एक करत यशाची पायरी चढत आहे. तर, दुसरीकडे संजना अधोगतीच्या मार्गाने जात आहे. यामध्येच अरुंधतीच्या यशात तिच्यावर प्रेम करणारा आशुतोषदेखील तिची वारंवार साथ देतोय. विशेष म्हणजे अरुंधतीवरील असलेलं प्रेम त्याने तिच्यासमोर कबुलही केलं आहे. मात्र,तरीदेखील हे दोघं छानपणे त्यांचं मैत्रीचं नात जपत आहेत. यामध्येच आता अरुंधतीलाही आशुतोषवर असलेल्या प्रेमाची जाणीव होणार आहे.

काही दिवसांपूर्वीच या मालिकेत आशुतोष उघडपणे अरुंधतीसमोर त्याच्या प्रेमाची कबुली देतो. मात्र, यावर अरुंधती शांतपणे  मैत्रीचा स्वीकार करते. परंतु, आता अरुंधतीलाही आशुतोषवर असलेल्या प्रेमाची जाणीव होणार आहे. 

सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये आशुतोषचा जबर अपघात होऊन तो जखमी होतो. ही बातमी कानावर पडल्यानंतर अरुंधती खचून जाते आणि हॉस्पिटलकडे धाव घेते. यामध्येच आशुतोषवर उपचार सुरु असताना अरुंधतीच्या भावनांचा बांध फुटतो आणि तिला आशुतोषवर असलेल्या प्रेमाची जाणीव होते. 

दरम्यान, आशुतोषप्रमाणेच अरुंधतीलाही प्रेमाची जाणीव झाली आहे. मात्र, तिचं हे अव्यक्त प्रेम आशुतोष समोर व्यक्त होईल का? आशुतोष या अपघातातून बचावेल का? पुढे काय घडेल या मालिकेत हे येत्या भागातच प्रेक्षकांना कळणार आहे.

Web Title: Arundhati will realize the love she has for Ashutosh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.