'आई कुठे काय करते'मधून अरुंधती होणार गायब, मोठं कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 12:30 PM2023-05-20T12:30:34+5:302023-05-20T12:31:35+5:30

Aai Kuthe Kay Karte :अरुंधतीच्या आयुष्यात नव्या घडामोडी घडणार आहेत.

Arundhati will disappear from 'Aai Kuthe Kay karte', the big reason has come to light | 'आई कुठे काय करते'मधून अरुंधती होणार गायब, मोठं कारण आलं समोर

'आई कुठे काय करते'मधून अरुंधती होणार गायब, मोठं कारण आलं समोर

googlenewsNext

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. मालिकेत वीणाची एंट्री झाल्यामुळे नवं वळण आल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान अरुंधतीच्या आयुष्यात नव्या घडामोडी घडणार आहेत. आशुतोषबरोबर लग्न करून अरुंधतीच्या आयुष्यात सुखाचे दिवस आले आहेत. त्यानंतर आता मोठी घडामोड अरुंधतीच्या आयुष्यात घडणार आहे. अरुंधती दोन्ही कुटुंबांना एका सुखद धक्का देणार आहे. 

मालिकेच्या आगामी भागात अरुंधतीला सुखद धक्का बसणार आहे. आशुतोषबरोबर सुरू झालेल्या नव्या संसारात आणखी एक नवा आनंद तिला मिळणार आहे. अरुंधतीला विदेशात गाण्याची संधी मिळणार आहे. या मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे ज्यात अरुंधती परदेशात जाणार आहे, हे कळल्यानंतर सगळे तिला शुभेच्छा देताना दिसत आहेत.

प्रोमोत पाहायला मिळत आहे की, यश अरुंधतीलासाठी फुलांचा गुच्छ घेऊन येतो आणि तिचे अभिनंदन करतो.  आशुतोष तिला तिचे अभिनंदन करण्यामागचे कारण सांगतो. तो म्हणतो की, अरुंधती तुला वर्ल्ड टूरची ऑफर आली आहे. पुढच्या काही दिवसात जगातील प्रतिष्ठीत शहरातील, प्रतिष्ठीत मंचावर तुझे गाणे होणार आहे. अभिनंदन. अरुंधतीला मिळालेली ही संधी पाहून सगळेच चकित होतात. वीणा आणि सुलेखा ताई देखील अरुंधतीचं कौतुक करतात. तिला मिळालेली इतकी मोठी संधी पाहून अरुंधती थोडी भावुक होते. अरुंधती आणि आशुतोष खोलीत बोलत असताना आशुतोष तिला समजावतो. तो अरुंधतीला म्हणतो, तू इथे लोक तुझ्यासाठी ज्या टाळ्या वाजवतील त्या मी ऐकेन अरुंधती. लोक तुझे कौतुक करतील तेव्हा मला आनंद होईल. असं म्हणत आशुतोष अरुंधतीला मिठीत घेतो. दोघांचा हा भावुक क्षण पाहण्यासाठी मालिकेचा आगामी एपिसोड पाहणे कमालीचे ठरणार आहे.


या प्रोमोवरून कळत आहे की मालिकेच्या आगामी काही भागात अरुंधती दिसणार नाही.  प्रत्यक्षात अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर लेकीसोबत सुट्ट्यांसाठी ऑस्ट्रेलिया ट्रिपवर गेली आहे. मधुराणीने मालिकेतून सुट्टी घेतल्यामुळे मालिकेतील अरुंधती देखील परदेशात गेल्याचे दाखवण्यात येणार आहे.

Web Title: Arundhati will disappear from 'Aai Kuthe Kay karte', the big reason has come to light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.