मराठी अभिनेत्रीनं नवरात्रीनिमित्त पुरुषांसाठी शेअर केली पोस्ट, म्हणाली "Dear Men..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 15:52 IST2025-09-25T15:37:59+5:302025-09-25T15:52:04+5:30
मराठी अभिनेत्रीनं नवरात्रीनिमित्त पुरुषांसाठी एक रोखठोक पोस्ट शेअर केली आहे.

मराठी अभिनेत्रीनं नवरात्रीनिमित्त पुरुषांसाठी शेअर केली पोस्ट, म्हणाली "Dear Men..."
Navratri 2025 : राज्यभरात शारदीय नवरात्रोत्सवाचा उत्साह सुरू आहे. नवरात्री हा सण देवी दुर्गेच्या नऊ रूपांचा आणि स्त्री शक्तीचा जागर करण्याचा एक महत्त्वाचा काळ मानला जातो. मराठी अभिनेत्री अपुर्वा गोरे हिनं पोस्टमधून समाजातील एका गंभीर समस्येवर प्रकाश टाकला आहे. तिने पुरुषांच्या दुटप्पी भूमिकेवर थेट बोट ठेवले आहे.
अपूर्वा गोरेने नवरात्रीच्या निमित्ताने आपल्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट शेअर केली आहे, जी सध्या खूप व्हायरल होत आहे. पुरुषांना उद्देशून लिहिले आहे, "Dear Men, तुम्ही जर तुमच्या आयुष्यात असलेल्या स्त्रीला मान देऊ शकत नसाल, तिला भावनिक त्रास देत असाल, तर कृपया नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देऊ नका. आम्ही आमच्या आयुष्यातल्या स्त्रियांना कसं सेलिब्रेट करतोय, याचं खोटं नाट्य उभं करू नका".
स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' या लोकप्रिय मालिकेतून अपूर्वानं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होतं. या मालिकेत तिनं ईशा ही भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे तिला एक वेगळी ओळख मिळाली होती. 'आई कुठे काय करते' या मालिकेनंतर अपूर्वा कोणत्या नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार, याबद्दल तिच्या चाहत्यांना उत्सुकता आहे. अपूर्वाचा चाहता वर्ग प्रचंड मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं दिसतं. ती चाहत्यांना वैयक्तिक आणि करिअरमधील अपडेट्स देत असते. अनेकदा अपूर्वा सोशल मीडियावरील ट्रेंडही फॉलो करताना दिसते.