अनुराग आणि प्रेरणा अडकले विवाहबंधनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 06:30 IST2019-02-01T06:30:00+5:302019-02-01T06:30:00+5:30

स्टार प्लस वाहिनीवरील ‘कसौटी झिंदगी के’ या मालिकेतील अनुराग (पार्थ समथान) आणि प्रेरणा (एरिका फर्नांडिस) यांचा शुभविवाह नुकताच पार पडला.

Anurag and Prerana Married in Kasauti Jindagi ke 2 | अनुराग आणि प्रेरणा अडकले विवाहबंधनात

अनुराग आणि प्रेरणा अडकले विवाहबंधनात

ठळक मुद्दे अनुराग आणि प्रेरणा यांचा शुभविवाह नुकताच पार पडला

स्टार प्लस वाहिनीवरील ‘कसौटी झिंदगी के’ या मालिकेतील अनुराग (पार्थ समथान) आणि प्रेरणा (एरिका फर्नांडिस) यांचा शुभविवाह नुकताच पार पडला. या मालिकेच्या पहिल्या आवृत्तीत अनुराग आणि प्रेरणा हे मालिकेच्या अखेरीस विवाहबद्ध झाल्याचे दाखविण्यात आले होते. पण आता या मालिकेतील भावी घडामोडींसाठी अनुराग-प्रेरणा यांचा विवाह प्रारंभीच पार पाडण्यात आला आहे.

अनुराग-प्रेरणा यांच्या प्रणयाचे रम्य चित्रण करणारा प्रोमो स्टार प्लस वाहिनीने अलिकडेच प्रसारित केल्यावर त्याला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद लाभला होता. या मालिकेच्या निर्मितीशी निकटचा संबंध असलेल्या सूत्राने सांगितले, “मालिकेच्या निर्मात्यांनी कथानकाला कलाटणी देण्यासाठी अनुराग आणि प्रेरणाचा विवाह एका मंदिरात पार पाडल्याचे दाखविले. नवीनबाबूच्या कचाट्यातून प्रेरणाची सुटका केल्यावर अनुराग आणि प्रेरणा एकमेकांविषयी असलेले आपले प्रेम
व्यक्त करतात आणि मग ते मंदिरात लग्न करतात. या अनपेक्षित घडामोडींमुळे प्रेक्षक मालिकेला खिळून राहतील आणि त्यांना या दोघांमधील उत्कट प्रेमाचे प्रसंग पाहायला मिळतील.”


या दोघांच्या अनपेक्षित विवाहामुळे प्रेक्षकांना धक्का बसणार असून आता यापुढे काय घडते, ते पाहण्याची उत्सुकता त्यांच्यात निर्माण होणार आहे.

Web Title: Anurag and Prerana Married in Kasauti Jindagi ke 2