‘अनुपमा’ बनली टीव्हीवरील सगळ्यात महागडी अभिनेत्री, रातोरात वाढवलं तिचं मानधन; जाणून घ्या किती...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 03:23 PM2023-01-31T15:23:07+5:302023-01-31T15:25:16+5:30

Rupali Ganguly Fees : या मालिकेत एका हाऊस वाइफची भूमिका करणाऱ्या रूपाली गांगुलीने सगळ्यांची मने जिंकली आहेत. रूपाली अनुपमाच्या भूमिकेत परफेक्ट फिट बसली आहे. असं वाटतं की, ही भूमिका तिच्यासाठीच बनली असेल.

Anupama fame Rupali Ganguly becomes Tv highest paid actress know per episode fees | ‘अनुपमा’ बनली टीव्हीवरील सगळ्यात महागडी अभिनेत्री, रातोरात वाढवलं तिचं मानधन; जाणून घ्या किती...

‘अनुपमा’ बनली टीव्हीवरील सगळ्यात महागडी अभिनेत्री, रातोरात वाढवलं तिचं मानधन; जाणून घ्या किती...

googlenewsNext

Rupali Ganguly Fees : टीव्हीवरील सगळ्यात फेमस मालिका ‘अनुपमा’ (Anupamaa) मधून अभिनेत्री रूपाली गांगुली घराघरात फेमस झाली आहे. तशी ही अभिनेत्री बऱ्याच वर्षानी मालिकेत दिसत आहे. पण टीव्हीवरील सगळ्या फेमस मालिका अनुपमाने तिचं नशीब पालटलं आहे. 

या मालिकेत एका हाऊस वाइफची भूमिका करणाऱ्या रूपाली गांगुलीने सगळ्यांची मने जिंकली आहेत. रूपाली अनुपमाच्या भूमिकेत परफेक्ट फिट बसली आहे. असं वाटतं की, ही भूमिका तिच्यासाठीच बनली असेल. या मालिकेने रूपालीला सगळ्यात जास्त फेमस तर केलंच सोबतच तिला टीव्हीवरील सगळ्यात महागडी अभिनेत्री सुद्धा बनवलं आहे.

एका इंग्रजी वेबसाईटवरील वृत्तानुसार, रूपाली गांगुली ‘अनुपमा’ च्या प्रत्येक एपिसोडसाठी 3 लाख रूपये इतकं मानधन घेते. तुम्हाला वाचून धक्का बसेल की, याआधी याच मालिकेसाठी रूपालीला दर एपिसोडला दीड लाख रूपये मानधन मिळत होतं. पण जसजशी मालिकेची लोकप्रीयता वाढली रूपाली गांगुली घराघरात फेमस झाली. आज तिला दर एपिसोडसाठी दीड लाख रूपये मानधन मिळतं. अशात ती आज टीव्हीवरील सगळ्यात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे. याआधी कोणत्याही अभिनेत्रीला एका एपिसोडसाठी इतकं मानधन मिळालेलं नाही.

कोट्यावधी रूपयांची मालक असलेल्या रूपाली गांगुलीने नुकतीच एक मर्सडीज कार खरेदी केली आहे. रूपालीने सोशल मीडियावर आपल्या परिवारातील नव्या सदस्यांसोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. रूपालीने तिचा मुलगा आणि पतीसोबत मर्सडीज कार खरेदी करण्याचा आनंद साजरा केला. 

‘अनुपमा’ ही मालिका बऱ्याच वर्षापासून टीआरपी चार्टमध्ये टॉपवर आहे. या मालिकेने बऱ्याच महिन्यांपासून टीआरपीवर ताबा मिळवला आहे. मालिका अजून चालावी म्हणून मेकर्स यात सतत नवीन ट्विस्ट आणत आहेत. काही दिवसांआधीच यात काही रोमॅंटिक सीनही शूट करण्यात आले होते. जे खूप गाजले.

Web Title: Anupama fame Rupali Ganguly becomes Tv highest paid actress know per episode fees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.