Ankita Lokhande Vicky Jain Wedding: अखेर अंकिता झाली मिसेस जैन, राजेशाही थाटात पार पडला सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 19:48 IST2021-12-14T19:40:41+5:302021-12-14T19:48:14+5:30

: टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) लग्नाच्या बेडीत अडकले आहेत.

Ankita lokhande vicky jain wedding picture out bride and groom look | Ankita Lokhande Vicky Jain Wedding: अखेर अंकिता झाली मिसेस जैन, राजेशाही थाटात पार पडला सोहळा

Ankita Lokhande Vicky Jain Wedding: अखेर अंकिता झाली मिसेस जैन, राजेशाही थाटात पार पडला सोहळा

Ankita Lokhande Vicky Jain Wedding: टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. अंकिता आणि विकीच्या लग्नसोहळ्या दरम्यानाचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात दोघेही खूप सुंदर दिसतायेत. व्हिडीओमध्ये दोघे एकमेंकाच्या गळ्यात हार घालताना दिसतायेत. अंकिता आणि विकीच्या लग्नाच्यासर्व विधी ही महाराष्ट्रीयन परंपरेनुसारच झाल्याचे कळतेय. अंकिताने गोल्ड रंगाचा लेहेंगा घातलाय आणि गळ्यात हेवी कुंदन आणि सोन्याचा हार घातलाय. नववधूच्या गेटअपमध्ये अंकिता खूपच सुंदर दिसतेय. तर विकीने क्रीम रंगाची शेरवानी घातलीय. मुंबईतल्या एका 5 स्टार हॉटेलमध्ये हा लग्नसोहळा सुरु आहे.अंकिता आणि विकी जैन यांच्या लग्नाच्या स्टेजची भव्यता नजरेत भरतेय. संपूर्ण स्टेज लाल-पांढऱ्या फुलांनी सजवण्यात आला होता.  

अंकिता लोखंडेच्या चाहत्यांची आणि जवळच्या मित्रांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. ती अखेर मिसेस विकी जैन झाली आहे. लग्नाच्यादिवशी, विक्की जैनने विंटेज कारमधून भव्य मिरवणूक काढली. गोल्डन ड्रेसमध्ये अंकिता जैन क्वीनपेक्षा कमी दिसत नव्हती. विकीला समोर पाहताच  अंकिता भावूक झाली. ती डोळ्यातले अश्रू पुसून विकीला मिठी मारताना दिसतेय..तिच्या लग्नापूर्वीच्या सोहळ्यांचे तिचे मेहंदी पासून ते संगीत सेरेमनीपर्यंत अनेक व्हिडिओ व्हायरल झाले. 

 

Web Title: Ankita lokhande vicky jain wedding picture out bride and groom look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.