Bigg Boss 17 : सुशांतने अंकिता लोखंडेबरोबर ब्रेकअप का केलं? इतक्या वर्षांनंतर अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 11:17 AM2023-10-31T11:17:51+5:302023-10-31T11:18:17+5:30

सुशांतबरोबरच्या रिलेशनशिपवर अंकिताने 'बिग बॉस'च्या घरात केलं भाष्य, म्हणाली...

ankita lokhande talk about break up with sushant singh rajput in bigg boss 17 house | Bigg Boss 17 : सुशांतने अंकिता लोखंडेबरोबर ब्रेकअप का केलं? इतक्या वर्षांनंतर अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...

Bigg Boss 17 : सुशांतने अंकिता लोखंडेबरोबर ब्रेकअप का केलं? इतक्या वर्षांनंतर अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...

'बिग बॉस हिंदी १७' इतर पर्वांप्रमाणेच प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करताना दिसत आहे. या पर्वात पहिल्या दिवसापासूनच 'बिग बॉस'ने स्पर्धकांबरोबर चाहत्यांना आश्चर्याचे धक्के द्यायला सुरुवात केली. कपल विरुद्ध सिंगल अशी थीम असलेल्या यंदाच्या 'बिग बॉस'च्या पर्वात अभिनेत्री अंकिता लोखंडे पती विकी जैनसह सहभागी झाली आहे. 'बिग बॉस'च्या घरात अंकिताने वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत. 

'पवित्रा रिश्ता' मालिकेतून अंकिता घराघरात पोहोचली. या मालिकेतील अर्चना या पात्राने तिला लोकप्रियता मिळवून दिली होती. अंकिताबरोबर दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतलाही याच मालिकेमुळे प्रसिद्धी मिळाली होती. या मालिकेतील त्यांची अर्चना आणि मानव ही जोडी प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस उतरली होती. रिल लाइफमध्ये पती पत्नीची भूमिका निभावणारे अंकिता आणि सुशांत खऱ्या आयुष्यातही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. अनेक वर्ष ते रिलेशनशिपमध्ये होते. परंतु, नंतर काही कारणांमुळे त्यांचं ब्रेकअप झालं. त्यांच्या ब्रेकअपमुळे चाहत्यांनाही धक्का बसला होता. आता इतक्या वर्षांनी अंकिताने सुशांतबरोबरच्या ब्रेकअपवर मौन सोडलं आहे. 

अंकिताने 'बिग बॉस'च्या घरात सुशांतबद्दल बोलताना त्याच्यबरोबरच्या ब्रेकअपचं खरं कारण सांगितलं आहे. 'बिग बॉस'च्या घरात मुनव्वर फारुकीबरोबर बोलताना अंकिता म्हणाली, "सुशांतच्या मृत्यूनंतर माझी अवस्था फार वाईट झाली होती. मला वाटलं की अशा व्यक्तीसाठी मला बोललं पाहिजे, ज्याच्याबरोबर मी कधीतरी रिलेशनशिपमध्ये होते. तो कोण आहे, हे लोकांना कळावं यासाठी...कारण, ज्याप्रकारे लोक त्याच्याबद्दल बोलत होते. तो तसा नव्हता." 

पुढे अंकिता ब्रेकअपबद्दल बोलताना म्हणाली, "त्याने मला सांगून गोष्टी कराव्यात एवढीच माझी इच्छा होती. तर मला कदाचित स्वत:ला सांभाळता आलं असतं. परंतु, त्यावेळी तो यशाच्या शिखरावर होता. त्यामुळेच बाकी लोकही त्याचे कान भरत होते. पण, मी त्याला कधीच कोणत्याच गोष्टीसाठी थांबवलं नाही." 

Web Title: ankita lokhande talk about break up with sushant singh rajput in bigg boss 17 house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.