अंकिता लोखंडेनं प्रेग्नंसीच्या चर्चांवर सोडलं मौन; म्हणाली- लग्न झाल्यावर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 12:17 IST2023-09-08T12:15:31+5:302023-09-08T12:17:00+5:30

अंकिताने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने प्रेग्नंसीच्या चर्चांमागील सत्य सांगितलं आहे.

Ankita lokhande reacted to baby bump photo and pregnancy news said i augh that | अंकिता लोखंडेनं प्रेग्नंसीच्या चर्चांवर सोडलं मौन; म्हणाली- लग्न झाल्यावर...

अंकिता लोखंडेनं प्रेग्नंसीच्या चर्चांवर सोडलं मौन; म्हणाली- लग्न झाल्यावर...

टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) म्हटलं की आठवते 'पवित्र रिश्ता' ही मालिका. या मालिकेतून अंकिता रातोरात स्टार झाली . अर्चना या भूमिकेने तिला वेगळी ओळख मिळवून दिली. सोशल मीडियावर अंकिता खूप सक्रिय असते. अभिनेत्री पती विकी जैनसोबतचे व्हिडीओ नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. गेल्या काही दिवसांपासून अंकिता प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने प्रेग्नंसीच्या चर्चांमागील सत्य सांगितलं आहे.  मध्यंतरीच्या काळात अंकिताचे मॉर्फ केलेले फोटोसुद्धा व्हायरल झाले होते यावर देखील तिने भाष्य केलंय.


अंकिता म्हणाली, मी या सगळ्याचा जास्त विचार करत नाही. अनेक सेलिब्रेटींना याचा सामना करावा लागतो. या सगळ्या गोष्टींमधून जाणारी मी एकटीच आहे असं मला वाटत नाही. जेव्हा तुम्ही सिंगल असता तेव्हा तुम्हाला लग्नाबाबत विचारलं जातं. लग्न झालं की बाळ कधी होणार, होणार आहे की नाही की बाळ झालंय किंवा तुम्ही प्रेग्नंट आहात का असे प्रश्न विचारले जातात. अशा पद्धतीच्या गोष्टी सतत लिहिल्या जातात आणि विचारल्या जातात.

अंकिता पुढे म्हणाली, या सगळ्या गोष्टींचा मला फरक पडत नाही. अनेकदा माझ्यावरील मीम्स देखील व्हायरल होतात. युट्यूब आणि सोशल मीडियावर माझे बेबी बंपसोबतचे फोटोसुद्धा मला पाहायला मिळतात. पण त्याकडे मी लक्ष देत नाही. मला हे सगळं पाहून हसू आलं.

अंकिताने २०२१मध्ये १४ डिसेंबरमध्ये विकीसोबत लग्न केलं. अंकिताचा पती विकी हा मोठा बिझनेस मॅन आहे. अगदी प्रत्येक सेक्टरमध्ये त्याचा बिझनेस आहे. विकी हा मुळचा छत्तीसगडचा आहे. अर्थशास्त्र विषयात पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर विकीने एमबीए केलंय. 

Web Title: Ankita lokhande reacted to baby bump photo and pregnancy news said i augh that