"आमच्या होणाऱ्या बाळाची...", अंकिता लोखंडेचा प्रेग्नंसीबाबत मोठा खुलासा, 'ती' पोस्ट व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 11:38 IST2025-09-29T11:37:52+5:302025-09-29T11:38:20+5:30
अंकितानेच त्यांच्या बाळाबद्दल भाष्य केलं आहे. अंकिताने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे अंकिता प्रेग्नंट असल्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत.

"आमच्या होणाऱ्या बाळाची...", अंकिता लोखंडेचा प्रेग्नंसीबाबत मोठा खुलासा, 'ती' पोस्ट व्हायरल
सध्या कलाविश्वातील अनेक अभिनेत्री लवकरच आई होणार आहेत. आता आणखी एक अभिनेत्री गुडन्यूज देण्याच्या तयारीत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून अंकिता लोखंडे प्रेग्नंट असल्याच्या चर्चा रंगत होत्या. आता खुद्द अंकितानेच त्यांच्या बाळाबद्दल भाष्य केलं आहे. अंकिताने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे अंकिता प्रेग्नंट असल्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत.
अंकिताने तिचा मित्र आणि निर्माता असलेल्या संदीप सिंहच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली. यामध्ये तिने त्यांच्या बाळाचाही उल्लेख केला आहे. "हॅपी बर्थडे संदीप. तुझ्यावर नेहमीच देवाची कृपा राहो. मी तुला फोन करण्याचा प्रयत्न केला पण नेहमीप्रमाणे तो लागला नाही. तू एक उत्तम व्यक्ती आहेस. कालसाठी थँक्यू. माझी, विकीची आणि आमच्या होणाऱ्या बाळाची काळजी आणि इतकं मनापासून व्यक्त झालास ते मला भावलं", असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
पोस्टमध्ये अंकिताने बाळाचा उल्लेख केल्याने ती खरंच गरोदर आहे का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. पण, अद्याप याबाबत कोणतीही ऑफिशियल माहिती अंकिता किंवा विकीने दिलेली नाही. अंकिता आणि विकीने २०२१ मध्ये लग्नाच्या बेडीत अकडत आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या लग्नाला ४ वर्ष पूर्ण झाली आहेत.