सुशांतबद्दलची ती गोष्ट मान्य करताच फसली अंकिता लोखंडे, सोशल मीडियावर जोरदार टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 09:29 AM2024-01-03T09:29:43+5:302024-01-03T09:31:06+5:30

अंकिताने सुशांतबद्दल केलेल्या एका दाव्यामुळे आता ती स्वत:च फसली आहे.

Ankita Lokhande in trouble as she accepted that sushant singh rajput had chlosterophobia netizens showed old tweet | सुशांतबद्दलची ती गोष्ट मान्य करताच फसली अंकिता लोखंडे, सोशल मीडियावर जोरदार टीका

सुशांतबद्दलची ती गोष्ट मान्य करताच फसली अंकिता लोखंडे, सोशल मीडियावर जोरदार टीका

अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) सध्या 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) मध्ये दिसत आहे. पकी विकी जैनसोबत तिने या वादग्रस्त रिएलिटी शोमध्ये सहभाग घेतला आहे. पहिल्या दिवसापासूनच अंकिता तिच्या एक्स बॉयफ्रेंड दिवंगत अभिनेता सुशांतसिह राजपूतबाबत (Sushant Singh Rajput) नवनवीन खुलासे करताना दिसत आहे. सुशांतच्या नावावर अंकिता सहानुभूती मिळवते असा आरोप अनेकांनी तिच्यावर केला आहे. अंकिताने सुशांतबद्दल केलेल्या एका दाव्यामुळे आता ती स्वत:च फसली आहे. नक्की काय आहे प्रकरण बघुया.

बिग बॉस १७ च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये अंकिता म्हणते की सुशांतला क्लॉस्टेरोफोबिया होता.  हा एक एंक्झायटी डिसऑर्डर आहे ज्यामुळे माणसाला एखाद्या गोष्टीची भीती वाटत असते. आता यावरुन अंकिता कशी फसली तर रिया चक्रवर्तीने एकदा एका मुलाखतीत सुशांतला क्लॉस्टेरोफोबिया असल्याचा उल्लेख केला होता. सुशांतला फ्लाईटची खूप भीती वाटते असं तिने सांगितलं होतं. त्याच्याकडे नेहमी एक गोळी असायची जी तो फ्लाईटमध्ये बसण्याआधी घ्यायचा. 

रिया या मुलाखतीवर तेव्हा अंकिताने ट्वीट करत हे खोटं असल्याचं सांगितलं होतं. अंकिताने सुशांतचा एक फोटो ट्वीट केला होता ज्यामध्ये तो स्वत: पायलट सीटवर बसला आहे. या फोटोसोबत तिने लिहिले,'हे आहे का क्लॉस्टेरोफोबिया? तुला नेहमीच उडायचं होतं आणि तू ते करुन दाखवलंस. आम्हाला तुझ्यावर गर्व आहे.'

सुशांतला हा आजार होता हे अंकिताने नुकतंच बिग बॉसमध्ये मान्य केल्याने आता तिचं जुनं ट्वीट व्हायरल होत आहे. अंकिताला नेटकऱ्यांनी चांगलंच धारेवर धरलं आहे. अगदी सुशांतनेही 2015 साली एका मुलाखतीत त्याला हा आजार असल्याचा खुलासा केला होता. तसंच यानंतर अंकिता खोटी असून रिया खरं बोलत होती असा सूरही सोशल मीडियावर उमटत आहे.

Web Title: Ankita Lokhande in trouble as she accepted that sushant singh rajput had chlosterophobia netizens showed old tweet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.