​अंजुम फकीह ही शब्बीर आहुवालियाची सर्वात मोठा चाहती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2017 16:46 IST2017-08-08T11:16:51+5:302017-08-08T16:46:51+5:30

कुमकुम भाग्य ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेच्या यशानंतर या मालिकेच्या निर्मात्यांनी कुंडली भाग्य ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस ...

Anjum Fakih is the biggest fan of Shabbir Ahuwalia | ​अंजुम फकीह ही शब्बीर आहुवालियाची सर्वात मोठा चाहती

​अंजुम फकीह ही शब्बीर आहुवालियाची सर्वात मोठा चाहती

मकुम भाग्य ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेच्या यशानंतर या मालिकेच्या निर्मात्यांनी कुंडली भाग्य ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणली आहे. या मालिकेला देखील प्रेक्षकांची तितकीच पसंती मिळत आहे. कुमकुम भाग्य या मालिकेच्या कथानकातूनच कुंडली भाग्य या मालिकेचे कथानक निर्माण झाले आहे. या मालिकेत धीरज धूपर, मनित जौरा, श्रद्धा आर्य आणि अंजुम फकीह प्रमुख भूमिकेत आहेत. या मालिकेत अंजुम सृष्टी ही भूमिका साकारत आहे. या मालिकेत काम करायला तिला खूपच आवडते. कारण ती कुमकुम भाग्य या मालिकेतील शब्बीर आहुवालियाची खूप मोठी फॅन आहे. शब्बीरने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला हिप हिप हुर्रे या मालिकेत काम केले होते. तेव्हापासूनच तिला शब्बीर प्रचंड आवडतो. कही तो होगा या मालिकेत त्याने साकारलेली भूमिका तर तिला प्रचंड आवडली होती. आपल्या या आवडत्या कलाकारासोबत काम करायला मिळत असल्याने अंजुम सध्या प्रचंड खूश आहे. ती सांगते, शब्बीरच्या व्यक्तिमत्त्वाच्या मी प्रेमात पडले आहे. त्याची अभिनय शैली तर मला खूपच आवडते. तो ज्या पद्धतीने स्वतःला कॅमेऱ्यासमोर सादर करतो, ते मला खूपच आवडते. तो मजेशीर स्वभावाचा असून तो सतत हसतमुख असतो. तो खूपच विनयशील आहे. तो स्वतः उत्तम खेळाडू असून त्याच्यासोबत कधी तरी फुटबॉल अथवा क्रिकेट खेळण्याची माझी इच्छा आहे. मी आतापर्यंत त्याच्यासोबत केवळ एकच प्रसंग चित्रीत केला आहे. तो माझ्या जीवनातील सर्वोत्तम दिवस होता. 

Also Read : कुमकुम भाग्य या मालिकेसाठी श्रुती झाचा नवा लूक

Web Title: Anjum Fakih is the biggest fan of Shabbir Ahuwalia