अंजू महेंद्रूने केला सोशल मीडियाचा त्याग
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2017 15:20 IST2017-08-08T09:50:31+5:302017-08-08T15:20:31+5:30
आजकाल सगळेच सोशल मीडियाचा वापर करताना आपल्याला दिसतात. सोशल मीडिया हा सेलिब्रिटींच्या आयुष्याचा तर अविभाज्य घटक बनला आहे. आपल्या ...

अंजू महेंद्रूने केला सोशल मीडियाचा त्याग
आ काल सगळेच सोशल मीडियाचा वापर करताना आपल्याला दिसतात. सोशल मीडिया हा सेलिब्रिटींच्या आयुष्याचा तर अविभाज्य घटक बनला आहे. आपल्या फॅन्सच्या सतत संपर्कात राहाण्यासाठी सेलिब्रिटी फेसबुक, ट्विटरवर नेहमीच अॅक्टिव्ह असतात. पण सोशल मीडियावर ट्रोल झाल्यामुळे एका अभिनेत्रीने सोशल मीडियावरून पळ काढला आहे.
रिश्तों का चक्रव्यूह या मालिकेत नारायणी शास्त्री, महिमा मकवाणा, प्रणित भट्ट प्रमुख भूमिका साकारत आहेत. या मालिकेची स्टारकास्ट तगडी असल्याने या मालिकेविषयी प्रेक्षकांच्या मनात चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. या मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री अंजू महेंद्रू महाराणीच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. अंजू महेंद्रू गेली अनेक दिवस सोशल मीडियापासून दूर आहेत. त्यांनी ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम वापरणेच आता बंद केले आहे.
अंजू महेंद्रू सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असायच्या. पण त्यांनी एकाएकी सोशल मीडियापासून दूर राहाण्याचे ठरवले आहे. त्यांनी सोशल मीडियाचा वापर बंद करण्यामागे एक खास कारण असल्याचे कळतेय. त्यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटवर काही भाष्य केले होते. या भाष्यामुळे त्या चांगल्याच अडचणीत आल्या असल्याचे म्हटले जात आहे. त्यांनी एका घटनेसंदर्भात केलेल्या एका अनुचित टिप्पणीमुळे त्यांच्यावर सोशल मीडियावर चांगलीच टीका करण्यात आली होती. परंतु टीकेचा हा भडिमार सहन न झाल्याने त्यांनी सोशल मीडियावरील आपली सगळी खाती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
या मालिकेत नारायणी शास्त्री सत्रुपा ही भूमिका साकारणार असून ती राजमाता असल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर महिमा मकवाणा अनामी ही भूमिका साकारणार आहे. ती एक आनंदी, खेळकर मुलगी आहे. पण या 17 वर्षांच्या मुलीला तिच्या आयुष्यातील काही रहस्य कळल्यामुळे तिचे संपूर्ण आयुष्यच बदलणार आहे.
Also Read : रिश्तो का चक्रव्यूह या मालिकेत प्रणित भट्ट दिसणार मेकअपशिवाय