नवरोबाच्या कानशिलात लगावली अन् अनीता हसनंदानी ट्रोल झाली, वाचा काय आहे भानगड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 18:34 IST2021-05-23T18:33:55+5:302021-05-23T18:34:54+5:30

Video : हा नव-याचा अपमान आहे. त्याने तुझा असा अपमान केला तर तुला चालेल का?, असा सवाल एका युजरने अनीता हसनंदानीला केला. 

anita hassanandani slaps husband rohit reddy in new prank video | नवरोबाच्या कानशिलात लगावली अन् अनीता हसनंदानी ट्रोल झाली, वाचा काय आहे भानगड

नवरोबाच्या कानशिलात लगावली अन् अनीता हसनंदानी ट्रोल झाली, वाचा काय आहे भानगड

ठळक मुद्देअनीताने आत्तापर्यंत टीव्हीच्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. मोहब्बतें, काव्यांजलि, नागीन अशा अनेक मालिकांमध्ये ती झळकली आहे.

छोट्या पडद्यावरची नागीन म्हणजेच अनीता हसनंदानी (Anita Hassanandani ) सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. अनीता नुकतीच आई झाली. सध्या ती आपल्या मुलाच्या संगोपनात बिझी आहे. पण तूर्तास तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय आणि इतकेच नाही तर या व्हिडीओमुळे अनीता जबरदस्त ट्रोल होतेय.
  व्हिडीओत अनीता पती रोहित रेड्डीसोबत प्रँक करतेय. रोहित बसलेला आहे तर त्याच्या पाठी अनीता उभी आहे. माझ्या हातात एक अदृश्य धागा आहे जो धागा ती रोहितच्या एका कानातून टाकून दुस-या कानातून बाहेर काढेल, त्यानंतर एक जादू होईल,असे अनीता व्हिडीओच्या सुरूवातीला म्हणते. (Anita Hassanandani prank video)

यानंतर काही फिल झाले का? असे ती रोहितला विचारते. रोहित यावर ‘नाही’ असे उत्तर देतो. यानंतर दुस-याबाजूने तू धागा खेच, असे ती रोहितला म्हणते. रोहित धागा खेचतो आणि क्षणात अनीता त्याच्या कानशिलात लगावते. त्यानंतर रोहित तिथून निघून जातो. 
‘कृपया घरी करू नका,’ असे कॅप्शन देत अनीताने हा व्हिडीओ शेअर केला आहे. अनीताचा हा प्रँक काहींना आवडला. पण काहींनी मात्र यावरून अनीताला जबरदस्त ट्रोल केले.
‘हा निव्वळ मूर्खपणा आहे. हा नव-याचा अपमान आहे. त्याने तुझा असा अपमान केला तर तुला चालेल का?, असा सवाल एका युजरने तिला केला. सोशल मीडियावर असा व्हिडीओ टाकणे किळसवाणे आहे, असे एका युजरने लिहिले. यात काहीही विनोद नाही, आशा करतो तुझ्या नव-याला राग आला नसेन, अशी कमेंट एका युजरने केली.

अनीता व रोहितने 2013 मध्ये लग्न केले होते. यावर्षी फेबु्रवारीत अनीताने पहिल्या मुलाला जन्म दिला. अनीताने आत्तापर्यंत टीव्हीच्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. मोहब्बतें, काव्यांजलि, नागीन अशा अनेक मालिकांमध्ये ती झळकली आहे.

Web Title: anita hassanandani slaps husband rohit reddy in new prank video