"...आणि एकदम फ्रेश झाले", मुक्ता बर्वेचा 'इंद्रायणी' मालिकेला निरोप, शेअर केली पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 09:36 IST2024-11-18T09:34:49+5:302024-11-18T09:36:29+5:30

Mukta Barve : मुक्ता बर्वे हिने इंद्रायणी मालिकेच्या सेटवरील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत पोस्ट लिहिली आहे.

"...and completely refreshed", Mukta Barve's farewell to 'Indrayani' series, shared post | "...आणि एकदम फ्रेश झाले", मुक्ता बर्वेचा 'इंद्रायणी' मालिकेला निरोप, शेअर केली पोस्ट

"...आणि एकदम फ्रेश झाले", मुक्ता बर्वेचा 'इंद्रायणी' मालिकेला निरोप, शेअर केली पोस्ट

कलर्स मराठीवरील ‘इंद्रायणी’ (Indrayani Serial) मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. इंदूचे निरागस प्रश्न, तिचे कीर्तन, आंनदीबाई आणि तिच्यातील संघर्ष, इंदूचे तिचे आदर्श, मार्गदर्शक म्हणजेच व्यंकू महाराजांशी असलेले नाते सगळंच रसिकांच्या मनाला भिडणारे आहे. आजवर मालिकेत बरेच ट्विस्ट बघायला मिळाले. अलिकडेच मालिकेत नवा ट्विस्ट आणत मुक्ता बर्वे (Mukta Barve) ची एन्ट्री झाली होती. मुक्ताने मुक्त इनामदारची भूमिका साकारली होती. यात ती एका वेगळ्या अंदाजात पाहायला मिळाली होती. दरम्यान आता मुक्ताने मालिकेतून निरोप घेतला आहे आणि तिने तिच्या शूटिंगदरम्याने व्हिडीओ शेअर करत पोस्ट केली आहे.

मुक्ता बर्वे हिने इंद्रायणी मालिकेच्या सेटवरील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत लिहिले की, कित्तीतरी दिवसांनी माझ्या जुन्या टीमबरोबर काम करायला मिळाले आणि एकदम फ्रेश झाले. रुद्रमनंतर पोतडी एण्टरमेंट बरोबर काम करण्याचा योग आलाच नव्हता. कलर्स मराठीमुळे इंद्रायणीमुळे हा योग पुन्हा जुळून आला. माझा लाडका मित्र आणि आवडता दिग्दर्शक विनोद लव्हेकर, तुझ्या बरोबर काम करताना किती छान वाटतं रे. काम संपलं की नेहमी वाटते अजून थोडे जास्त काम हवे होते.


तिने पुढे लिहिले की, सगळं जुनं मित्रमंडळ निखिल, नितिन, शिवा जी, सॅंडी, विशाल भेटले. फ्रेश वाटले. माझी आवडती अनिता दाते केळकर भेटली तिच्याबरोबर थोडे काम करता आले, धमाल आली. संदीप पाठक तुला मिस केले. इंद्रायणीची सगळी टीम. सगळे कलाकार ,विशेष म्हणजे सांची भोईर म्हणजे छोटीशी इंद्रायणी कित्ती सहज सुंदर काम करतेस. ज्यांची ज्यांची कामं फक्त बघत होते त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष काम करता आलं. फार छान वाटलं. आभारी आहे. खूप प्रेम.

Web Title: "...and completely refreshed", Mukta Barve's farewell to 'Indrayani' series, shared post