​अनस रशिद दिसणार तू सुरज मैं सांझ पिया की मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2017 11:04 IST2017-05-15T05:34:59+5:302017-05-15T11:04:59+5:30

अनस रशिदने दिया और बाती हम या मालिकेत काम केले होते. या मालिकेत त्याने साकारलेली सुरज ही भूमिका प्रेक्षकांना ...

Anas Rashid is going to see you Suraj I have done that in the evening | ​अनस रशिद दिसणार तू सुरज मैं सांझ पिया की मध्ये

​अनस रशिद दिसणार तू सुरज मैं सांझ पिया की मध्ये

स रशिदने दिया और बाती हम या मालिकेत काम केले होते. या मालिकेत त्याने साकारलेली सुरज ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. दिया और बाती हम या मालिकेने काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला आणि आता या मालिकेचा दुसरा सिझन असलेली तू सुरज में सांझ पिया की ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. दिया और बाती हम या मालिकेतील दीपिका सिंग, अनस रशिद यांच्या भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या होत्या. पण तू सुरज में सांझ पिया की मध्ये प्रेक्षकांना दीपिका आणि अनिसला पाहाता आले नाही. हे दोघे वगळता दिया और बाती हममधील अनेक कलाकार प्रेक्षकांना तू सुरज में सांझ पियामध्ये पाहायला मिळत आहेत. पण मालिकेच्या सुरुवातीलाच संध्या आणि सुरजचा मृत्यु झाल्याचे आपल्याला दाखवण्यात आले होते. पण मालिका सुरू झाल्यापासून प्रेक्षक त्यांच्या सुरज आणि संध्याला मिस करत आहे. संध्याची भूमिका साकारणारी दीपिका गरोदर असल्याने ती पुन्हा मालिकेत येणे शक्य नाही. पण अनस आता मालिकेत पुन्हा येणार असल्याचे म्हटले जात आहे. सुरजची मुलगी कनकला प्रोत्साहन देण्यासाठी, तिची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी सुरज कनकच्या स्वप्नांमध्ये येणार असल्याचे दाखवण्यात येणार आहे. संध्याला करियरमध्ये यश मिळवून देण्यासाठी सुरज नेहमीच तिच्या पाठिशी उभा राहिला होता. त्याचप्रमाणे तो आता कनकला तिची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मदत करणार आहे. या मालिकेसाठी तो लवकरच चित्रीकरणाला सुरुवात करणार असल्याचे म्हटले जात आहे. 

Web Title: Anas Rashid is going to see you Suraj I have done that in the evening