अमृता खानविलकर दिसणार या थरारक रिअ‍ॅलिटी शोमध्ये, स्वत: केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 06:30 IST2019-07-19T06:30:00+5:302019-07-19T06:30:00+5:30

हिंदी व मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयानं सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडियावर अ‍ॅक्टीव्ह असते.

Amruta khanvilkar gets approached for khatron ke khiladi 10 | अमृता खानविलकर दिसणार या थरारक रिअ‍ॅलिटी शोमध्ये, स्वत: केला खुलासा

अमृता खानविलकर दिसणार या थरारक रिअ‍ॅलिटी शोमध्ये, स्वत: केला खुलासा

हिंदी व मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयानं सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडियावर अ‍ॅक्टीव्ह असते. वेगवेगळ्या अंदाजातील फोटो ही ती अपलोड करत असून रसिकांची प्रशंसा मिळवताना दिसते. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार अमृता ‘खतरों के खिलाडी 10'मध्ये दिसणार आहे.  या शोचे अँकरींग दिग्दर्शक रोहित शेट्टी करणार आहे. शोचे शूटिंग ऑगस्ट महिन्यात सुरु होणार असल्याच्या चर्चा सुरु आहे.

अमृताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिने फॅन्स अमृताने 'खतरों के खिलाडी'मध्ये सहभागी होऊ की नको असा प्रश्न विचारला आहे. अमृताच्या या पोस्टमुळे ती  'खतरों के खिलाडी'मध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.


अमृता खानविलकरचा अभिनय आणि नृत्य यावर रसिक तितकेच फिदा आहेत.  मराठी सिनेमांसह अमृताने आपल्या डान्सने छोट्या पडद्यावरही वेगळी ओळख निर्माण केली आहे. पती हिमांशूसह तिने डान्स रियालिटी शो ‘नच बलिये’चे विजेतेपदसुद्धा पटकावलं होतं.


लवकरच अमृता पॉन्डेचेरी या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. सचिन कुंडलकर या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. कुंडलकर आणि तेजस मोडकने या सिनेमाची कथा लिहली आहे. या सिनेमाची कथा नेमकी काय हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. मात्र सिनेमाची तगडी स्टारकास्ट रसिकांना आकर्षित करेल. कारण यात अमृता खानविलकरसह सई ताम्हणकर आणि वैभव तत्तववादी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

Web Title: Amruta khanvilkar gets approached for khatron ke khiladi 10