अमृता सुभाषचे बॉलिवूडमध्ये पदार्पण
By Admin | Updated: April 23, 2016 07:38 IST2016-04-23T01:13:12+5:302016-04-23T07:38:04+5:30
मराठी इंडस्ट्रीमध्ये मराठी मालिका व चित्रपटांसहित आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री अमृता सुभाष हिनेदेखील आता, बॉलिवूडमध्ये पदापर्ण केले आहे

अमृता सुभाषचे बॉलिवूडमध्ये पदार्पण
मराठी इंडस्ट्रीमध्ये मराठी मालिका व चित्रपटांसहित आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री अमृता सुभाष हिनेदेखील आता, बॉलिवूडमध्ये पदापर्ण केले आहे. बॉलिवूडमध्ये तगडा अभिनेता नवाज्जुद्दीन सिद्दीकीसोबत अमृता ‘रमण राघव’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे अनुराग कश्यप दिग्दर्शित हा चित्रपट असून, या चित्रपटाचा प्रीमिअर कान्स २०१६च्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार आहे. हा सायको थ्रीलर ड्रामा असून, सत्यघटनेवर आधारित आहे. १९६०मध्ये मुंबईत रमण राघव या सिरीयल किलरने अनेकांची हत्या केली होती. अमृताला यापूर्वी ‘किल्ला’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कारदेखील प्राप्त झाला होता. तसेच ती ‘अवघाची संसार’ या मालिकेतूनदेखील महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचली होती. आपल्या पहिल्या बॉलिवूड फिल्मच्या प्रदर्शनापूर्वीच्या हा यशाचा आनंद ट्विटरवर व्यक्त करताना अमृता म्हणाली, ‘‘रमण राघव या माझ्या आगामी अनुराग कश्यप दिग्दर्शित आणि नवाज्जुद्दीन सिद्दीकी स्टार चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमिअर हा कान्स २०१६ फिल्म फेस्टिव्हलमध्ये होत आहे.’’